रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ पुरस्काराने शेखरकुमार अहिरेंचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ पुरस्काराने शेखरकुमार अहिरेंचा गौरव
रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ पुरस्काराने शेखरकुमार अहिरेंचा गौरव

रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ पुरस्काराने शेखरकुमार अहिरेंचा गौरव

sakal_logo
By

rat28p17.jpg
65186
राजापूरः ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन संस्थेचा पुरस्कार ‘रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ’ स्वीकारताना शेखरकुमार अहिरे.
--------------------
रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ
पुरस्कार शेखरकुमार अहिरे यांना
राजापूर, ता. २८ः सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन संस्थेचा ‘रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ तथा मॅनेजिंग डायरेक्टर’ या पुरस्काराने राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांना गौरवण्यात आले. पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात अहिरे यांना प्रदान करण्यात आला.
पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन ही संस्था राज्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून दरवर्षी कर्तृत्वान व्यक्तीचा शोध घेऊन त्यांचा गौरव करत असते. यावर्षी विविध व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन संस्थेतर्फे गौरवण्यात आले. त्यामध्ये राजापूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अहिरे यांना‘रत्नागिरी भूषण बेस्ट सीईओ तथा मॅनेजिंग डायरेक्टर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. राजापूर अर्बन बँकेच्या प्रगतीमध्ये अहिरे यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. सभासदांसह ग्राहकांना आधुनिक बँकिंग सेवा-सुविधा देत बँकेच्या केलेल्या प्रगतीची दखल घेऊन अहिरे यांना रत्नागिरी भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांना यापूर्वी विविध संस्थांनी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.