Sun, Feb 5, 2023

सावंतवाडी शहरात
मुसळधार पाऊस
सावंतवाडी शहरात मुसळधार पाऊस
Published on : 28 November 2022, 12:28 pm
65272
सावंतवाडी ः शहरात पडलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.
सावंतवाडी शहरात
मुसळधार पाऊस
सावंतवाडी,ता.२८ ः शहरासह परिसरात आज मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने सगळ्यांचीच तारांबळ उडाली. यावेळी मळगाव परिसर तब्बल एक तास पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान वारंवार कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत सापडले आहेत. तर या वातावरणाचा काजूसह इतर उत्पादनांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे.