
रत्नागिरी- आगरवाडी येथून तरुण बेपत्ता
लांजा-आगरवाडीतून तरुण बेपत्ता
लांजा, ता. २८ ः शहरातील आगरवाडी येथील तरुण घरातून निघून गेला तो परत आला नाही. या प्रकरणी लांजा पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. कुलदीप दर्शन आग्रे (वय २१) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २६) सकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप हा शनिवारी सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडला होता. सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्याने लांजा बसस्थानकातून त्याने राजापूर गाडी पकडली होती. त्यानंतर तो राजापूर जवाहरचौक येथे सकाळी साडेनऊ वाजता गाडीतून उतरला होता. त्यानंतर त्याच्या मोबाईलचे अंतिम लोकेशन हे तळगाव राजापूर असे दाखवले आहे; मात्र त्यानंतर त्याचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्याचे मित्रपरिवार, नातेवाईक व सर्वत्र शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी लांजा पोलिसात खबर देण्यात आली. खबरीवरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. कुलदीप कोणाला आढळून आल्यास लांजा पोलिस ठाणे तसेच मंगेश बापेरकर, प्रसाद भाई शेट्ये, दर्शन आग्रे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.