देशभक्तीपर गायनात १२० जण सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशभक्तीपर गायनात १२० जण सहभागी
देशभक्तीपर गायनात १२० जण सहभागी

देशभक्तीपर गायनात १२० जण सहभागी

sakal_logo
By

65309
माणगाव ः कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना माजी सैनिक चंद्रशेखर जोशी. शेजारी परशुराम चव्हाण, स्नेहल फणसळकर, एकनाथ केसरकर आदी.

देशभक्तीपर गायनात १२० जण सहभागी

माणगावची स्पर्धा; वासुदेवानंद सरस्वती शाळेचे वर्चस्व

माणगाव, ता. २८ ः येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सैनिक चंद्रशेखर जोशी यांनी दीपप्रज्वलनाने केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन बबनराव खोचरे, माजी सैनिक शिवराम जोशी उपस्थित होते.
शालेय विद्यार्थ्यांच्या दोन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा ः पहिली ते पाचवी-श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, प्राथमिक शाळा माणगाव नं. २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माणगाव, उत्तेजनार्थ प्राथमिक शाळा माणगाव नं १. सहावी ते आठवी-श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव, प्राथमिक शाळा माणगाव नं. २, प्राथमिक शाळा साळगाव नं. २, उत्तेजनार्थ प्राथमिक शाळा माणगाव नं १. यात काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी संगीत साथ दिली. त्यात शर्मिला धरणे, हेरंब भाटकर, भार्गवी काशिद यांनी हार्मोनियमची साथ दिली. तर काही शाळांच्या संगीत शिक्षकांनी साथ दिली. परीक्षक म्हणून विजय सावंत, रघुवीर परब यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे आयोजन सैनिक पतसंस्थेने केले होते. प्रास्ताविक संस्था सचिव एकनाथ केसरकर यांनी, आभार संस्थाध्यक्ष परशुराम चव्हाण यांनी मानले. यावेळी संस्था उपाध्यक्षा स्नेहल फणसळकर, शाम पावसकर, सदाशिव पाटील, दादा कोरगावकर, विजय केसरकर आदी उपस्थित होते.