बांदा येथील व्ही. एन. नाबर स्कूल रस्त्याची डागडुजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा येथील व्ही. एन. नाबर
स्कूल रस्त्याची डागडुजी
बांदा येथील व्ही. एन. नाबर स्कूल रस्त्याची डागडुजी

बांदा येथील व्ही. एन. नाबर स्कूल रस्त्याची डागडुजी

sakal_logo
By

65311
बांदा ः येथे रस्त्याची श्रमदानाने दुरुस्ती करताना नाबर प्रशाळेचे विद्यार्थी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

बांदा येथील व्ही. एन. नाबर
स्कूल रस्त्याची डागडुजी
बांदा ः येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे जाणाऱ्या व दुरवस्था झालेल्या रस्त्याची श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आली. या रस्त्यावरील खडी उखडल्याने भलेमोठे खड्डे पडले होते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने रस्त्यावरून वाहनाने ये-जा करणे धोकादायक बनले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रशाळेचे क्रीडा शिक्षक प्रशांत देसाई यांची मदत घेऊन रस्त्याची श्रमदानाने दुरुस्त केली. रस्त्यावर असलेले मोठे खड्डे माती टाकून, श्रमदान करून बुजवले. रस्त्यालगतच्या परिसराची साफसफाई व डागडुजी केली. यावेळी मुख्याध्यापिका मनाली देसाई उपस्थित होत्या.
--------
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत
सिंधुदुर्गनगरी ः पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती वभटक्या जमाती विद्ययानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात येणार असल्याची, माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख यांनी दिली. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात पाचवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छूक विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.
------------
मालवण परिसरात पाऊस
मालवण ः शहर परिसरात आज पावसाचा शिडकाव झाला. अचानक सुरु झालेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत विजा चमकत होत्या. एकूणच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी, बागायतदारांमधून होत आहे.