बाळासाहेबांची शिवसेना - भाजपची युती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेबांची शिवसेना - भाजपची युती
बाळासाहेबांची शिवसेना - भाजपची युती

बाळासाहेबांची शिवसेना - भाजपची युती

sakal_logo
By

65297
सावंतवाडी ः जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीची घोषणा करताना राजन तेली, संजय आंग्रे, अशोक दळवी, महेश सारंग, नारायण राणे, महेश धुरी आदी.

लोगो - ग्रामपंचायत निवडणूक

बाळासाहेबांची शिवसेना - भाजपची युती
राजन तेली; कार्यकर्ते दुखावणार नाहीत, याची काळजी घेणार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रपणे लढण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ३२५ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युतीचा धर्म पाळून सामोरे जाणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. हा निर्णय शेवटच्या क्षणात ठरला असल्याने उशीर झाला, तरी ज्या ठिकाणी शक्य असेल, तेथे स्थानिक नेतृत्वाला विचारात घेऊन युती करण्यात येणार असल्याचे तेली म्हणाले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, भाजपचे महेश सारंग, मनोज नाईक, भाजपचे तालुकाध्यक्ष महेश धुरी, संजय माजगावकर, परीक्षित मांजरेकर, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे, दिलीप भालेकर, केतन आजगावकर, शेखर राणे, सुनील पारकर, महेंद्र सावंत, भूषण परुळेकर उपस्थित होते.
तेली म्हणाले, ‘‘सुमारे एक महिना उमेदवार निवड, कागदपत्रे गोळा करण्याचे नियोजन सुरू आहे. भाजपने स्वबळावर तयारी केली होती; मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन युतीने निवडणूक लढवायचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पातळीवर उमेदवार निहाय निर्णय घेऊन निवडणूक लढवू.’’
ते म्हणाले, ‘‘दोन्ही पक्षांची स्वबळावरची तयारी केली होती; पण आता नेतृत्वाच्या आदेशाची अंमलबजावणी करू. तालुका निहाय युतीचा निर्णय घेत असताना ज्यांचे पारडे जड तेथे तडजोड केली जाईल, मात्र यात कार्यकर्ते दुखावणार नाहीत, याचीही काळजी घेऊ. सावंतवाडी खरेदी-विक्री संघात युती करून निवडणूक लढविली होती, तशीच ग्रामपंचायतीत युती केली जाईल. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन नियोजन करू.’’

ते चित्र काही मोजक्याच ठिकाणी
तालुक्यात काही ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना-भाजप एकत्र येऊन स्थानिक पातळीवर निवडणुकीला सामोरे जात असल्याबाबत तेली यांना विचारले असता काही मोजक्या ठिकाणी असे झाले आहे; मात्र अन्यत्र कुणीही शिवसेनेसोबत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

देवगडात दोन अर्ज
दरम्यान, जिल्ह्यात आजपासून ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली. देवगडात पहिल्या दिवशी सदस्य पदासाठी केवळ दोन अर्ज दाखल झाले. सरपंचपदासाठी एकही अर्ज आलेला नाही. अर्जांसाठी दोन डिसेंबर अंतिम मुदत आहे.