रत्नागिरी-ग्रामपंचायत निरंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-ग्रामपंचायत निरंक
रत्नागिरी-ग्रामपंचायत निरंक

रत्नागिरी-ग्रामपंचायत निरंक

sakal_logo
By

उमेदवारी अर्जाचा पहिला दिवस निरंक
ग्रामपंचायत निवडणूक ; मंत्री सामंतांकडून रत्नागिरीत बैठक
रत्नागिरी, ता. २८ः ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे; मात्र पहिल्याच दिवशी रत्नागिरी तालुक्यातून एकही अर्ज आलेला नाही. तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. यामध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून निवडणुकीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे दोन पक्ष आमनेसामने आले असून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तालुक्यात २९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. त्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता. दुपारी ३ वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच पक्षांकडून गावागावामध्ये बिनविरोध जागांसाठी प्रयत्न सुरू होते; मात्र शिवसेनेचे दोन पक्ष झाल्यामुळे अनेक जागांवर निवडणूका निश्‍चित मानल्या जात आहेत. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात सर्वाधिक अर्ज भरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी मंत्री सामंत यांनी गेल्या काही दिवसात जोरदार फिल्डींग लावली आहे. सोमवारी दुपारी पाली येथे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. मंत्री सामंत यांनी आढावा घेऊन निवडणुकीत यश मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. प्रत्येकावर जबाबदार निश्‍चित करून दिल्या आहेत.