
रत्नागिरी-तज्ञ संचालकपदी डॉ. प्रतीक झिमण
rat28p34.jpg-
65330
डॉ. प्रतिक झिमण
------------
रत्नागिरी अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेच्या
तज्ञ संचालकपदी डॉ. प्रतीक झिमण
रत्नागिरी, ता. २८ः रत्नागिरी शहराजवळ असलेल्या रत्नागिरी अर्बन को- बँकेच्या तज्ञ संचालकपदी डॉ. प्रतीक सुजित झिमण यांची निवड करण्यात आली.
रत्नागिरी अर्बन को-बँकेच्या संचालकपदाची निवड प्रक्रिया सोमवारी (ता. २८) झाली. यावेळी बँकेचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी डॉ. झिमण यांची सर्वानुमते निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. झिमण यांचे नाव आरोग्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कायम अग्रेसर आहे. बँकेतील नियुक्तीच्या निमित्ताने आता सहकार क्षेत्रातही पहायला मिळणार आहे. बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे डॉ. झिमण यांच्या असलेल्या जनसंपर्काचा फायदा बँकेला होणार आहे. नवनवीन संकल्पना बँकेत राबविण्यात येणार असून ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा मानस डॉ. झिमण यांनी व्यक्त केला. बँकेचे ठेवीवरील आकर्षक व्याजदराचा फायदा जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बँकेच्या वतीने डॉ प्रतिक सुजित झिमण यांनी केले आहे. नियुक्ती झाल्यानंतर डॉ. झिमण यांच्या मित्र परिवाराने अभिनंदन केले.