बांद्यातील बेपत्ता वृद्धाचा गळफास स्थितीत मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यातील बेपत्ता वृद्धाचा
गळफास स्थितीत मृतदेह
बांद्यातील बेपत्ता वृद्धाचा गळफास स्थितीत मृतदेह

बांद्यातील बेपत्ता वृद्धाचा गळफास स्थितीत मृतदेह

sakal_logo
By

65341
सदानंद कळंगुटकर


बांद्यातील बेपत्ता वृद्धाचा
गळफास स्थितीत मृतदेह

बांदा, ता. २८ ः तीन दिवसांपासून बेपत्ता असलेले सदानंद शिवराम कळंगुटकर (वय ६२, रा. बांदा -सटमटवाडी) यांचा मृतदेह घराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. बांदा पोलिसात आकास्मिक मृत्यूची नोंद झाली.
सविस्तर माहिती अशी की, सदानंद शिवराम कळंगुटकर हे २५ पासून घरातून बेपत्ता होते. घरात कोणालाही न सांगता ते निघून गेले होते. याबाबतची खबर त्यांचा मुलगा शिवराम याने बांदा पोलिसात दिली होती. आज शोधाशोध करताना घराच्या मागील बाजूकडील जंगलात जंगली झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस निरीक्षक शामराव काळे, कर्मचारी ज्योती हरामलकर, प्रथमेश पवार, संजली पवार, प्रशांत पवार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहचे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डोम जगदीश पाटील यांनी विच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यांच्या मागे आई, पती, २ मुलगे, भाऊ आसा परिवार आहे. अधिक तपास बांदा पोलिस करत आहेत.
----------
विषारी औषध पिलेल्या विवाहितेचा मृत्यू
बांदा, ता. २८ ः विलवडे-वरचीवाडी येथील विषारी औषध पिलेल्या महिलेचा गोव्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुभांगी सदाशिव दळवी (वय ३४), असे त्यांचे नाव आहे. शनिवारी (ता.२६) सकाळी त्यांनी विषारी औषध पिले होते. स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल केले. गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात पाठविण्यात आले. बांबोळी रुग्णालयात त्यांची तब्येत उपचाराला साथ देत नव्हती. अखेर रविवारी (ता.२७) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. बांबोळी रुग्णालयातून विलवडे सरपंच दिनेश दळवी, गणेश दळवी, प्रदिप दळवी, बाबुराव दळवी, विश्राम दळवी, कालिदास दळवी, माजी उपसभापती विनायक दळवी, सोनू दळवी आदींनी आज सायंकाळी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांचा मृतदेह बांदा येथील प्राथमिक आरोग केद्र शवगृहात ठेवला आहे. गोवा पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली. अत्यंविधी उद्या (ता.२९) सकाळी होणार आहे. त्यांच्या पश्चात पती, सासरा, तीन मुली असा परिवार आहे. विलवडे छत्रपती शिवाजी पतसंस्था लिपिक सदाशिव दळवी यांच्या त्या पत्नी होत.