दुचाकीस्वार मारहाणप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीस्वार मारहाणप्रकरणी
सात जणांवर गुन्हे दाखल
दुचाकीस्वार मारहाणप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल

दुचाकीस्वार मारहाणप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By

दुचाकीस्वार मारहाणप्रकरणी
सात जणांवर गुन्हे दाखल
मालवण, ता. २८ : चाफेखोल-इंदुलकरवाडी बस थांब्याजवळ दुचाकी व मोटार यांच्यात झालेल्या अपघातावेळी दुचाकीस्वार यशवंत अर्जुन घाडीगावकर (वय २२, रा. चाफेखोल गावकरवाडी) याला शिवीगाळ करून दगडाने मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत घाडीगावकर हा काल (ता. २७) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीने (एमएच०७ यू ८२५०) चाफेखोल-इंदुलकरवाडी बस थांब्याजवळून जात असताना शैलेश शंकर माळकर याच्या मोटारीने (एमएच ०२ बीवाय ४२९६) धडक दिली. या अपघाताच्या घटनेवरून दोघांमध्ये समझोता सुरु असताना आनंद ऊर्फ पप्पू वराडकर, मंदार आनंद वराडकर, अरुण तेली, विनायक इंदुलकर, मंगेश पोल (रा. कुणकवळे), सूरज वायंगणकर, सोनू वायंगणकर (रा. चाफेखोल) यांनी यशवंत याला धमकावून हाताच्या ठोशाने मारहाण केली. अरुण तेली व सोनू वायंगणकर या दोघांनी पायावर दगड मारून दुखापत केली व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.