शिवसेना सोडण्यासाठी भाजपकडून दबाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना सोडण्यासाठी
भाजपकडून दबाव
शिवसेना सोडण्यासाठी भाजपकडून दबाव

शिवसेना सोडण्यासाठी भाजपकडून दबाव

sakal_logo
By

शिवसेना सोडण्यासाठी
भाजपकडून दबाव
देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांचे पोलिसांत निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी भाजप आमदार नीतेश राणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्यावर पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जात असून याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन येथील पोलिसांत दिले आहे.
आपल्या कुटुंबाला धोका असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,‘आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडून आलो आहे. मागील काही दिवसांपासून आपल्यावर पक्ष सोडून भाजप पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जात होता. प्रारंभी त्याकडे दुर्लक्ष केले. तथापि ७ नोव्हेंबरला भाजप नगरसेविका प्रणाली माने, मिलिंद माने आले. त्यांनी त्यांच्या मोबाईलवरून आमदार श्री. राणे यांच्याशी बोलणे करून दिले. त्या वेळेस आमदार राणे यांनी पुढील १० दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडून भाजप पक्षात प्रवेश करावा असे सांगितले. त्यावर आपण त्यांना स्पष्ट नकार दिला होता. आपल्याला पक्षाशी एकनिष्ठ राहायचे असल्याचे माने यांना सांगितले. त्यानंतर २४ तारखेस अनोळखी मोबाईलवरून मिसकॉल आले.’’
------
शरद ठुकरूल यांची
ठाकरे गटाविरोधात तक्रार
देवगड, ता. २८ ः येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील भाजप नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल यांनी आपल्याला भाजप सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात येण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे.
श्री. ठुकरूल यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आपण पक्षाच्या तसेच आपल्या प्रभागाच्या वेगवेगळ्या कामांसाठी नगरपंचायतीमध्ये जातो. तेथे आपल्याला वारंवार भेटून शिवसेना नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी तसेच नगरसेवक संतोष तारी शिवसेना पक्षात येण्यासंदर्भात विचारणा करतात. पक्षात प्रवेश करण्यासाठी दबाव आणत आहेत. तसेच आर्थिक अमिष दाखवत आहेत. आपण कामासाठी नगरपंचायत तसेच बाहेर देवगड जामसंडे परिसरात गेलो असता पाठलाग करून येऊन आपल्याला सारखा त्रास देत आहेत. त्यामुळे आपण मानसिक दडपणाखाली आहे. आपल्या तब्बेतीस काही झाल्यास पूर्णपणे दोन्ही नगरसेवक संतोष तारी व निवृत्ती उर्फ बुवा तारी जबाबदार असतील