रत्नागिरी- हिंदु राष्ट्र जागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- हिंदु राष्ट्र जागृती
रत्नागिरी- हिंदु राष्ट्र जागृती

रत्नागिरी- हिंदु राष्ट्र जागृती

sakal_logo
By

rat०१२१.txt

(टुडे पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१p६.jpg-
६५८०७
रत्नागिरी ः हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या प्रचारासाठी आयोजित दुचाकी फेरीला शहरात उदंड प्रतिसाद लाभला.

शहरातून वाहनफेरी

हिंदू राष्ट्र-जागृती सभा; ३ डिसेंबरला होणार विराट गर्दी

रत्नागिरी, ता. १ ः हिंदू राष्ट्र जागृती सभेनिमित्त आयोजित दुचाकी वाहनफेरीला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या फेरीमुळे सभा विराट होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. या सभेची जय्यत तयारी पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
संपूर्ण जगाला ज्ञानाचा प्रकाश पुरवणारी हिंदू संस्कृती आज झाकोळली जात आहे. भारतभूमी आणि हिंदू धर्मावरील काजळी दूर करण्यासाठी, हिंदूंना जागृत आणि संघटित करण्यासाठी या सभेचे आयोजन शनिवारी (ता. ३) सायंकाळी ५ वा. मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे केले आहे. या सभेच्या प्रसारासाठी शहरातून वाहनफेरी काढण्यात आली. या फेरीत धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
फेरीचे सूत्रसंचालन हिंदू जनजागृती समितीचे महेश लाड यांनी केले. मारूती मंदिर येथे धर्मध्वजाच्या पूजनाने फेरीला आरंभ झाला. रामआळी, गोखले नाका, काँग्रेस भवन, टिळक आळी, झाडगाव नाका, स्वातंत्र्यलक्षी चौक, गोखलेनाका, मारूती आळी येथून जयस्तंभ येथे फेरीची सांगता झाली. फेरीमध्ये श्री मरूधर विष्णू समाज, पाटीदार समाज, हिंदू राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गो सेवा संघ रत्नागिरी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुत्वाची ज्वाला प्रज्वलित करणार
हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून हिंदुत्वाची ज्वाला प्रगती करायची आहे. जगात ख्रिस्ती, मुसलमान यांची राष्ट्र आहेत; मात्र एकही हिंदू राष्ट्र नाही, ही वस्तुस्थिती पालटण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत याचे मार्गदर्शन हिंदू राष्ट्र जागृती सभेमध्ये करण्यात येणार आहे. सभेला हिंदूंनी उपस्थित रहा असे आवाहन विनय पानवळकर यांनी केले.