
संक्षिप्त
rat०११४.txt
(टुडे पान ३ साठी)
मराठे महाविद्यालयात आपले विज्ञानवर कार्यशाळा
राजापूर ः तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये ’आपले प्रश्न आपले विज्ञान’ या विषयावर नुकतीच एकदिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख प्रा. मिलिंद सोहनी यांच्या हस्ते झाले. या वेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. जी. डी. हराळे, उन्नत महाराष्ट्र अभियान प्रकल्पाचे स्थानिक समन्वयक हर्षद तुळपुळे यांच्यासह अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षचे समन्वयक डॉ. अतुले भावे, प्रा. शेवडे, प्रा. कीर्ती महानवर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रा. सोहनी यांनी पदवी शिक्षणानंतर शिक्षण आणि कौशल्य यांची सांगड घालून स्थानिक समस्या विचारात घेऊन कशा पद्धतीने स्वयंरोजगार प्राप्त करता येईल या संबंधित सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन स्वयं अभ्यासाने यशस्वी होण्याचा मार्गही विषद केला. तुळपुळे यांनी व्यावसायिक कौशल्यातून आत्मनिर्भर बनण्याचा साऱ्यांना त्यांनी सल्ला दिला.
मराठे महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा
राजापूर ः तालुक्यातील विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयामध्ये नुकताच संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे हातिवले येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पवार, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. जी. डी. हराळे आदींनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी, उपप्राचार्य डॉ. संजय मेस्त्री यांनी प्रस्ताविक केले तर संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन प्रा. ए. के. शेवडे यांनी केले. एनएसएस विभागाचे प्रकल्प अधिकारी डॉ. ए. बी. सोनार यांनी आभार मानले.
हातिवलेत दत्तजयंती उत्सव
राजापूर ः आदिनाथ सांप्रदायिक अध्यात्म भक्तीज्ञान प्रसारक ओम सिद्धसेवा समाज ज्ञानमंदिर हातिवले येथे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी येत्या बुधवारी (ता. ७) श्री दत्तजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्ताने त्या दिवशी सकाळी ७ ते ९ वा. अभिषेक, पूजा, महाआरती, ९ ते १० वा विचारमंथन, १० ते ११ वा. प. पू. सद्गुरू विश्वनाथ (भाई) गोसावी महाराज यांचे प्रवचन, ११ ते १२.३० वा. श्री दत्तजन्म आख्यान व कीर्तनकार निकिता शेलार यांचे कीर्तन, १२.३० ते १ दत्तजन्म सोहळा, १ ते ५ वा. दर्शन, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ६ ते ७ वा. भजन, ७ ते ८ वा. पालखी उत्सव, ९ ते ११ वा. कराड येथील हभप प्रा. आकाश चव्हाण यांचे कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ओम सिद्धसेवा समाजमंडळ व व्यवस्थापक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
फोटो ओळी
-rat१p१२.jpg ः
६५८१७
गावतळे ः नळपाणी योजना भूमिपूजनप्रसंगी माजी आमदार संजय कदम, मुजीब रूमाने, अयाज खोत व मान्यवर.
उन्हवरेत पाणी योजना कामाचे भूमिपूजन
गावतळे ः दापोली तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उन्हवरे, फरारे, वावघर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना मंजूर करण्यात आली. फरारे नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी आमदार संजय कदम यांच्या झाला. या वेळी दापोली विधानसभा क्षेत्राध्यक्ष मुजीब रूमाणे, ग्रामीण अध्यक्ष मोगरेवाडी नारायण जाधव, ग्रामपंचायत उन्हवरे माजी सरपंच अयाज खोत, उन्हवरे ग्रामपंचायत माजी सरपंच प्राची पवार आदी उपस्थित होते.