पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु
पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु

पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु

sakal_logo
By

टीपः swt18.jpg मध्ये फोटो आहे.
65825
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे. सोबत नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर आदी.


जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरू

राज ठाकरे ः छत्रपतींना धक्का लावणारा ‘माय का पूत’ नाही

कुडाळ, ता. १ ः राज्यात जातीयतेचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सुरू केले असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना धक्का लावणारा ‘माय का पूत’ अजून जन्माला आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले श्री. ठाकरे यांनी येथील लाईम लाईट हॉटेलमध्ये कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांना परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा १९९९ मध्ये जन्म झाला. त्यावेळेपासून या राज्यात जातीयतेचे विष कालवले जात असून, पवार हेच त्याचे निर्माते आहेत. इतिहासाचा वापर जातीयता निर्माण करण्यासाठी केला जात असून, छत्रपती शिवाजी महाराज यांना धक्का लावणारा ‘माय का पूत’ अजूनही जन्माला आलेला नाही. पवार यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. ते केवळ फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेतात. मी जर चुकीचे सांगत असेन, तर त्यांची मागची भाषणे काढून बघावीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलणे चुकीचे आहे. त्याकाळी इतिहासामधून स्फुरण चढावे यासाठी पोवाडे, तसेच इतर माध्यमांचा वातावरणनिर्मितीसाठी वापर केला जात होता. मावळे किती दौडले, ते कोण होते, किती होते, याचा पुरावा कुठेही नाही. केवळ एका राज्यात समान नागरी कायदा येत नसतो; तर संपूर्ण भारतात नागरिक कायदा यावा, अशी मागणी आमची असून, हे केंद्राच्या हातात आहे.’
ते म्हणाले, ‘इतिहास हा रुक्ष आहे. तर्काच्या आधारावर कुठेही मूळ पुरुषाच्या इतिहासाला धक्का न लावता, त्रास न होता, चुकीचे अर्थ न लावता इतिहासकार इतिहास उभा करत असतात. यासाठी पोवाडे व इतर माध्यमांचा वापर केला जात होता. आपल्याकडचा इतिहास हा कोणी मराठा किंवा ब्राह्मणाने लिहिलेला नाही.’
राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काहीच संबंधच नव्हता. हा विषय त्यांनी मुद्दामहूनच काढला. अशा विषयाला पत्रकारांनी प्रसिध्दी का द्यायची, असा प्रश्न करत उध्दव ठाकरे फिरल्याने माझ्या पोटात गोळा येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, जीजी उपरकर, अमित ठाकरे, धीरज परब, हेमंत जाधव, प्रसाद गावडे, दीपक गावडे, बाबल गावडे, जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी, मनसैनिक आदी उपस्थित होते.
...............
बॉक्स
गटबाजी दूर करण्यासाठी दौरा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा राजकीय दौरा असून, जिल्ह्यात संघटनात्मक विस्कळीतपणा दूर करणे गरजेचे होते. गटबाजीला चाळण लावणेही तेवढेच गरजेचे आहे. अनेक मनसे सैनिक गटबाजीसारख्या गोष्टींना कंटाळून घरात बसले आहेत. त्यांना या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी हा दौरा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
--------------
चौकट
टोल नाका सुरू तर होऊ दे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल नाका सुरू होणार असून, याबाबत आपली भूमिका काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता टोल नाका सुरू झालाच पाहिजे. कारण ज्यावेळी मी टोल नाका बंदचे आंदोलन केले, त्यावेळी सर्वांनी पाठिंबा देणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.