
दाभोळ-दापोलीत संविधान दिनी 75 महिला मंडळांचा गौरव
rat०१२९.txt
(पान २ साठी)
दापोलीत संविधान दिनी ७५ महिला मंडळांचा गौरव
दाभोळ ः दापोली तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे भारतीय संविधान गौरवदिनाचे आयोजन करण्यात आले होते. देशाचा अमृतमहोत्सव व संविधान गौरवदिनानिमित्त दापोलीतील ७५ महिला मंडळांचा या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच ७५ शाळांना संविधान प्रतींचे वाटप करण्यात आले.
या वेळी ओबीसी राज्य प्रवक्ते रोशन पाटील यांनी मार्गदर्शन केले. तुझ्या पाऊलखुणा भीमराया हा कार्यक्रम झाला. संविधानावर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम गायक अनिल जाधव व सुहासिनी शिंदे यांनी सादर केला. राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेतील आयुषी काटकर या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला. प्रितम रुके यांनी संविधानाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चंडे, जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, स्वागताध्यक्ष राहुल जाधव, नगराध्यक्षा ममता मोरे, राज्य सरचिटणीस गौतम सोनवने, जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, जिल्हा युवा अध्यक्ष परितोष मर्चंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.