रत्नागिरी ः घरगुती ग्राहकांसाठी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः घरगुती ग्राहकांसाठी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प
रत्नागिरी ः घरगुती ग्राहकांसाठी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

रत्नागिरी ः घरगुती ग्राहकांसाठी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

sakal_logo
By

rat०१३१.TXT

(पान २ साठीमेन)

घरगुती ग्राहकांसाठी सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प

केंद्र शासनाची योजना ; शून्य टक्के वीजबिल, करा ऑनलाईन अर्ज
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १ ः सेव्ह एनर्जी, सेव्ह इंडिया योजनेंतर्गत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने घराच्या छपरावर सौर पॅनल बसवून सौर ऊर्जा निर्मितीतून शून्य टक्के वीजबिल ही संकल्पना राबवली जात आहे. यासाठी वीजग्राहकांना ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. जिल्ह्यात प्रशासकीय इमारतींवर सौरपॅनल बसवण्याचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आणली आहे.
विजेच्या संकटाने अनेक गावे अंधारात आहेत. शेतीसाठीही वीज मिळत नसल्याने अनेक अडचणी आहेत. यावर उपाय म्हणून केंद्राने ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून रूप टॉप सौरऊर्जा योजनेंतर्गत महावितरणसाठी २५ मेगावॅट विजेचे उद्दिष्ट मंजूर केले आहे. आता या योजनेतून घरगुती वर्गातील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेच्या क्षेत्रावरील रूफ टॉप सौरऊर्जा निर्मितीचे केंद्र बनवण्यासाठी केंद्राकडून वित्तीय अनुदान थेट खात्यात जमा केले जाणार आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून, यासाठी ग्राहकांना महावितरण कंपनीच्या एमएनआरईच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
घरगुती सोलर यंत्रणा बसवण्यासाठी केंद्राने मान्यताप्राप्त कंपनींना परवाना दिला आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित कंपन्यांकडून आपल्या घराच्या वीज वापराची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर हे सोलर युनिट घरावर बसवले जाईल. या युनिटची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सोलर ऊर्जेचा वापर पुरवठ्याप्रमाणे करता येणार आहे. या सोलरमध्ये निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा ही महावितरणकडे शिल्लक राहणार आहे. यासाठी स्वतंत्र अशा अद्ययावत मीटरची व्यवस्था करण्यात आली आहे. घरगुती वापरांमध्ये महावितरणच्या वीजमीटरचे केवळ नाममात्र निश्चित केलेले शुल्क अदा करावे लागेल. त्यामुळे ज्या ग्राहकांनी घरगुती सोलर ऊर्जेचा वापर केला असेल त्यांना महावितरणच्या विजेची आवश्यकता भासणार नाही; परंतु, ज्या वेळी नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत कमी होईल. अशावेळी आपल्याला महावितरणच्या पॉवर सप्लायचा थेटपणे वापर करता येईल. त्यामुळे दुहेरी वापरासाठी ही घरगुती योजना असेल. सर्वसाधारण पाचशे ते हजार रुपये वीजबिल येणाऱ्‍या ग्राहकांना ही योजना किफायतशीर आहे. निवासी संकुले सामायिक वीजमीटरच्या माध्यमातूनही ही सोलर ऊर्जा घेता येईल. घरगुती ग्राहकाला प्रत्येक वीजमीटरच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करून या अनुदानित योजनेचा लाभ घेता येणार आहे.


वीस ते चाळीस टक्के अनुदान

घरगुती वीज ग्राहकांसाठी एक ते तीन किलो वॅटपर्यंत ४० टक्के अनुदानित आणि तीन किलोपेक्षा अधिक ते १० किलो वॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यातून सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत २० टक्के तर प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट मर्यादेत गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघ अशांना घरगुती वापरासाठी २० टक्के अनुदान या योजनेतून दिले जाणार आहे.