
पेट्रोलपंपावर चोरी करणाऱ्या चोरट्यास अटक
rat०१४६.txt
(पान ३ साठी)
पेट्रोलपंपावर चोरी प्रकरणी एकास अटक
गोळप येथील प्रकार ; ३ दिवसाची कोठडी
रत्नागिरी, ता. १ ः पावस ते पूर्णगड मार्गावर गोळप येथील पेट्रालपंपात कर्मचाऱ्याच्या बॅगेतील रोकड चोरून नेणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाला पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद अली वल्द गुलाम हुसेन उर्फ हुसेन अब्बासी दालमा (वय ४५, रा. लाजपत नगर, दक्षिण दिल्ली) असे त्या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार १३ डिसेंबर २०२१ सायंकाळी घडला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुसद्दीक मुकादम यांच्या मोटारीचा चोरट्याने गोळप-वडवली या भागातील पेट्रोलपंपावर वापर करून येथील कर्मचारी (फिलर) आदित्य माटल यांच्या खांद्याला असलेल्या बॅगेतील २२ हजार ५०० रोकड लांबवली. या प्रकरणी मुकादम यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिस अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस हवालदार देऊसकर करत होते. तपासात पोलिसांनी हिंगणघाट (जि. वर्धा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेला संशयित मोहम्मद दालमा याला काल (ता.३०) अटक केली. त्याने पेट्रोलपंपावर केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात आणखी एक अन्य संशयित आहे; मात्र त्याचे नाव, पत्ता समजू शकले नाही. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.