
वीरश्री ट्रस्ट तर्फे 11 डिसेंबरला सायकल रॅली
rat०१५०.txt
(पान ३ साठी, अॅंकर)
वीरश्री ट्रस्टतर्फे ११ डिसेंबरला सायकल रॅली
डॉ. शिंदे ; कुटुंबासह सायकलिंगचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १ : सुदृढ रत्नागिरीसाठी सातत्याने काम करणाऱ्या वीरश्री ट्रस्टतर्फे यंदा कुटुंबासह सायकलिंग हा उद्देश समोर ठेऊन तिसऱ्यांदा सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. येत्या ११ डिसेंबरला शिवाजीनगर मंगळवार बाजार ते झरीविनायक व शिवाजीनगर ते वायंगणी या मार्गावर रॅली होणार आहे. सशक्त रत्नागिरी प्रदूषणमुक्त रत्नागिरी असा संदेश रॅलीतून देण्यात येणार आहे, अशी माहिती वीरश्री ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. नीलेश शिंदे म्हणाले, ११ ते १४ वर्षे वयोगटासाठी शिवाजीनगर मंगळवार बाजार येथून ११ डिसेंबरला सकाळी ५.३० वाजता सायकल रॅली सुरू होईल. या गटासाठी शिवाजीनगर ते झरीविनायक व पुन्हा शिवाजीनगरला यायचे आहे. १५ ते पुढील वर्षे वयोगटातील व्यक्तींनी शिवाजीनगर येथून, जयस्तंभमार्गे भाट्ये, वायंगणी फाट्यापर्यंत जाऊन तिथून परत याच मार्गाने शिवाजीनगरला यायचे आहे. हे अंतर २५ किलोमीटर आहे. रॅली पूर्ण करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक व मेडल देण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या ५०० जणांना टी शर्ट दिला जाणार आहे. मार्गावर पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक कार्यरत असतील, रुग्णवाहिकेची व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.
डॉ. तोरल म्हणाल्या की, पहाटे ५.३० वाजता या रॅलीला सुरवात होणार आहे. संपूर्ण कुटुंबाने या रॅलीमध्ये सहभागी व्हावे. वीरश्री ट्रस्टने या पूर्वी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. सन २०१८ आणि २०१९ मध्ये रॅली काढली होती. २०१९ मध्ये तब्बल १२०० जणांनी यात सहभाग घेतला होता. दोन वर्षे कोरोनामुळे रॅलीचे आयोजन करता आले नव्हते. परंतु आता पुन्हा कुटुंबालाच सायकलिंगची सवय लागावी व प्रदूषणमुक्त रत्नागिरीसाठी या रॅलीचे आयोजन केले आहे.
नोंदणीसाठी लिंक
सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/ZAegZz६ZBvKytvgB६ या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थी, युवक आणि महिलांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.