जातीपलिकडे इतिहास पाहणे गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जातीपलिकडे इतिहास पाहणे गरजेचे
जातीपलिकडे इतिहास पाहणे गरजेचे

जातीपलिकडे इतिहास पाहणे गरजेचे

sakal_logo
By

65947
राज ठाकरे

जातीपलिकडे इतिहास पाहणे गरजेचे

राज ठाकरे ः मेहंदळेंचे म्हणणे खरे असल्याचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे. सध्या जातीतून इतिहास पाहण्याचे पेव फुटले आहे, असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘वेडात मराठे, वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केले.
ऐतिहासिक चित्रपटात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप होत आहे. याही चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो आहे. त्यांनी गजानन मेहंदळे म्हणतात ते खरे असल्याचे सांगितले असल्याचेही वक्तव्य आज येथे पत्रकार परिषदेत श्री. ठाकरे यांनी केले.
ठाकरे म्हणाले, ‘‘ठराविक मुठभर लोकच असे करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तर मुस्लिम मते जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचे नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सहा जणांची नावे टाकली. मग कोणीतरी बोलले ही सहा नावे नाहीत, तर ही सहा नावे आहेत. गंमत बघा, मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतुहल वाटते तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे, समजून घेतले पाहिजे.’’
श्री. ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘मध्यंतरी मी गजानन मेहंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारले की, वेडात मराठे वीर दौडले सातबाबत कोणी ही सहा नावे सांगत आहे, तर कोणी ती नावे सांगत आहेत. तुमचं म्हणणे काय? मी यावर काल पवार साहेबांशीही बोललो. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलत आहेत.’’
----------
कोट
गजाननराव इतिहासाचे दाखले आणि संदर्भ यांचे ते अभ्यासक आहेत. मी मेहंदळे यांना हे काय आहे? असे विचारले. ते शांत बसले आणि म्हणाले की, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानावर ते सात होते की आठ होते की दहा हे कोठेही लिहिलेले नाही. प्रतापराव गुजर यांच्याबरोबर कोणत्या नावाचे कोण लोक होते, याचा जगाच्या इतिहासात काहीही दाखला नाही. आतापर्यंत आपण जी नावे ऐकली ती सर्व काल्पनिक नावे आहेत.
- राज ठाकरे