राजापूर-प्रकल्पबाधिताना जमिनीचा योग्य मोबदला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-प्रकल्पबाधिताना जमिनीचा योग्य मोबदला
राजापूर-प्रकल्पबाधिताना जमिनीचा योग्य मोबदला

राजापूर-प्रकल्पबाधिताना जमिनीचा योग्य मोबदला

sakal_logo
By

rat1p25.jpg
65931
राजापूरः शीळ येथील लघु पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या जनसुनावणीवेळी लोकांशी संवाद साधताना उपविभागीय अधिकारी वैशाली माने. या वेळी उपस्थित सरपंच अशोक पेडणेकर, कृष्णा नागरेकर आणि विविध विभागांचे अधिकारी.
-------
आठ महिन्यात प्रकल्पबाधितांना मोबदला
शीळ धरण; दोन वाड्यांच्या पूनर्वसनाची जनसुनावणीच्या बैठकीत मागणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ः तालुक्यातील शीळ येथे धरण प्रकल्प उभारणी आणि प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य केल्यास येत्या सात ते आठ महिन्यात प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी शहरानजीकच्या शीळ येथे जनसुनावणीवेळी ग्रामस्थांना दिली. या वेळी त्यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे उपविभागीय अधिकारी माने आणि जलसंधारण विभागाचे अधिकारी लाड यांनी निरसन केले.
शीळ येथे शासनाच्या जलसंधारण विभागामार्फत लघु पाटबंधारेतर्फे धरण उभारले जात आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी उपविभागीय अधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी झाली. या वेळी झालेल्या चर्चेच्यावेळी प्रकल्पबाधित शेतकरी, ग्रामस्थांनी प्रकल्पातील जमीन, झाडे याचा मोबदला कधी आणि किती मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित केला. प्रकल्पठिकाणापासून सुमारे दोन किमी अंतरावर खाली वसलेल्या दोन वाड्यांना भविष्यात धोका संभवत असल्याने या वाड्यांमधील ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याबाबत विचार व्हावा, धरणातील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोफत देण्यात यावे, धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी व झाडांचा मोबदला मिळावा, कालव्यामध्ये जाणाऱ्या झाडांचे मुल्यमापन होऊन योग्य तो मोबदला मिळावा अशा मागण्याही ग्रामस्थांनी मांडल्या. या मागण्यांचे लेखी निवेदन व ग्रामसभेच्या ठरावाची प्रत माने यांना देण्यात आली. भाकर संस्थेने धरण प्रकल्प अनुषंगाने तयार केलेल्या सामाजिक परिणाम निर्धारण अहवालाचेही वाचन करण्यात आले.
ज्ञानसागर वाचनालयामध्ये झालेल्या या जनसुनावणीवेळी सरपंच अशोक पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा नागरेकर, जलसंधारण अधिकारी बी. डी. नार्वेकर, एस. पी. लाड, कृषी अधिकारी व्ही. बी. पाटील, मंडळ अधिकारी पाटील, तलाठी संदीप कोकरे, ग्रामसेवक डिगुळे, ठेकेदार देसाई, भाकरसंस्थेचे जनार्दन सावंत उपस्थित होते.

चौकट
महसूल विभागाकडून ग्वाही
या वेळी झालेल्या चर्चेच्यावेळी माने यांनी जमीन मोबदल्याबद्दल आश्वासित करताना प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जास्तीत जास्त मोबदला दिला जाईल. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य प्रशासन आणि प्रकल्पाला करावे, असे आवाहन केले. हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळावा म्हणून शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून लागणारे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. तशा सूचना त्यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिल्या. तसेच प्रकल्प अनुषंगाने ग्रामस्थांनी मांडलेल्या सूचना व मागण्यांची पूर्तता करण्याबाबतच्या सूचना त्यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.