
देवगडात सरपंचपदास ३५ सदस्य पदासाठी १७६ अर्ज
देवगडात सरपंचपदास ३५
सदस्य पदासाठी १७६ अर्ज
देवगड, ता. १ : तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ३५ तर सदस्य पदासाठी १७६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, यापुर्वी सरपंच पदासाठी १८ तर सदस्य पदासाठी ६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील एकूण ३८ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ३८ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदाच्या ३८ आणि सदस्य पदाच्या ३०२ अशा एकूण ३४० जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत सरपंच पदासाठी एकूण ५३ तर सदस्य पदासाठी एकूण २३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी सांडवे ग्रामपंचायत (५), पडेल ग्रामपंचायत (३), खुडी, हिंदळे, मिठमुंबरी, सौंदाळे, तोरसोळे ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी दोन तर बापर्डे, दाभोळे, दहिबांव, गवाणे, गिर्ये, किंजवडे, कोटकामते, महाळुंगे, मणचे, नाद, नारिंग्रे, ओंबळ, पोंभुर्ले, पोयरे, साळशी, वाघिवरे, वाघोटण ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी एक असे एकूण ३५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच सदस्य पदासाठी सौंदाळे (१२), पडेल, सांडवे, तोरसोळे (प्रत्येकी १०), गिर्ये, कुवळे, पोंभुर्ले, वाघोटण (प्रत्येकी ९), खुडी (८), बापर्डे, दहिबांव, कोटकामते, महाळुंगे, विजयदुर्ग (प्रत्येकी ७), चाफेड, साळशी (प्रत्येकी ६), हिंदळे, नारिंगे्र (प्रत्येकी ५), पेंढरी, फणसे (प्रत्येकी ४), चांदोशी, किंजवडे, मणचे, नाद (प्रत्येकी ३), बुरंबावडे, गवाणे, मिठमुंबरी, ओंबळ, पोयरे (प्रत्येकी २) तर आरे, कट्टा, वाघिवरे ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी एक असे एकूण १७६ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने दिली. दरम्यान, उद्या (ता.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. आज येथील तहसील कार्यालयात उमेदवारांसह विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींची गर्दी होती.