पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु
पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु

पान एक-जातीचे राजकारण पवारांकडूनच सुरु

sakal_logo
By

सुधारित बातमी

टीपः swt18.jpg मध्ये फोटो आहे.
65825
कुडाळ : पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे. सोबत नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर आदी.

जातीचे राजकारण
राष्ट्रवादीने सुरू केले

राज ठाकरे : छत्रपतींना धक्का लावणारा ''माय का पूत'' नाही

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १ ः राज्यात जातीयतेचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथील पत्रकार परिषदेत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना धक्का लावणारा ''माय का पूत'' अजून जन्माला आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले मनसेचे अध्यक्ष ठाकरे यांनी येथील लाईम लाईट हॉटेलमध्ये कुडाळ, सावंतवाडी व वेंगुर्ले येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांना परिषद घेतली. या वेळी बोलताना त्यांनी पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचा १९९९ मध्ये जन्म झाला. त्यावेळेपासून या राज्यात जातीयतेचे विष कालवले जात आहे. इतिहासाचा वापर जातीयता निर्माण करण्यासाठी केला जात असून, छत्रपती शिवाजी महाराज यांना धक्का लावणारा ''माय का पूत'' अजूनही जन्माला आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेच केवळ फूले, शाहू, आंबेडकर यांची नावे घेऊन राजकारण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी ते काहीच बोलत नाहीत. समान नागरी कायदा एका राज्यासाठी येत नसतो; तर संपूर्ण भारतात नागरिक कायदा आला पाहिजे. यावा, अशी आमची मागणी असून हे केंद्राच्या हातात आहे.’’
इतिहास हा रुक्ष आहे. तर्काच्या आधारावर कुठेही मूळ पुरुषाच्या इतिहासाला धक्का न लावता, त्रास न होता, चुकीचे अर्थ न लावता इतिहासकार इतिहास उभा करत असतात. यासाठी पोवाडे व इतर माध्यमांचा वापर केला जात होता. राहुल गांधींना सावरकरांचा विषय काढण्याचा काहीच संबंधच नव्हता. हा विषय त्यांनी मुद्दामून काढला. उद्धव ठाकरे फिरल्याने माझ्या पोटात गोळा येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, जीजी उपरकर, अमित ठाकरे, धीरज परब, हेमंत जाधव, प्रसाद गावडे, दीपक गावडे, बाबल गावडे, जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी, मनसैनिक आदी उपस्थित होते.
...............
बॉक्स
गटबाजी दूर करण्यासाठी दौरा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौरा राजकीय दौरा असून जिल्ह्यात संघटनात्मक विस्कळितपणा दूर करणे गरजेचे होते. गटबाजीला चाळण लावणेही तेवढेच गरजेचे आहे. अनेक मनसे सैनिक गटबाजीसारख्या गोष्टींना कंटाळून घरात बसले आहेत. त्यांना या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी हा दौरा असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
--------------
चौकट
टोल नाका तर सुरूच व्हावा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल नाका सुरू होणार असून याबाबत आपली भूमिका काय आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता टोल नाका सुरू झालाच पाहिजे. कारण ज्यावेळी मी टोल नाका बंदचे आंदोलन केले, त्यावेळी सर्वांनी पाठिंबा देणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.