
वेंगुर्लेत सरपंचपदासाठी ४५, सदस्य पदासाठी २४० अर्ज
65984
वेंगुर्ले ः ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी उमेदवारांची झालेली गर्दी.
वेंगुर्लेत सरपंचपदासाठी ४५,
सदस्य पदासाठी २४० अर्ज
वेंगुर्ले, ता. १ ः तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आतापर्यंत एकूण सरपंच पदासाठी ४५ तर सदस्य पदासाठी २४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ३० नोव्हेंबरला सरपंच पदासाठी ९ व सदस्य पदासाठी ३६ तर आज सरपंच पदासाठी ३० तर सदस्य पदासाठी १८३ अर्ज दाखल करण्यात आले. तालुक्यात ३० ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. काल व आज या दोन दिवसांत सीताराम राणे, मायकल लोबो, अर्जुन भुते, भूषण मांजरेकर (रेडी), संजना करंगुटकर (चिपी), सचिन उर्फ दादा सारंग, समाधान बांदवलकर, उदय गोवेकर (दाभोली), आकांक्षा चव्हाण, रिया चव्हाण (म्हापण), प्राची नाईक व प्रणाली नाईक (वेतोरे), प्राची नाईक व तृप्ती परब (शिरोडा) व प्रतीक्षा मुंडये, सुविधा खुळे, अंकिता वायंगणकर (भोगवे), मोहन जाधव, बाळा जाधव (आसोली), विनायक खवणेकर, रामचंद्र भगत, मंगलदास टिकम, प्रकाश खोबरेकर (मेढा), शांताराम जाधव (पालकरवाडी), नीलेश चमणकर (उभादांडा), अनन्या पुराणिक (वजराट), अंजली तेली, प्रणिती आंबडपालकर (परुळेबाजार), सुशील नांदोस्कर, वैभवी पोतदार, रुपाली नाईक (मठ), गणेश गावडे, शेखर गावडे (अणसूर), शमिका बांदेकर (परबवाडा), नीलेश सामंत, प्रमोद परब (कुशेवाडा) यांनी अर्ज दाखल केले.