उमरोलीत राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमरोलीत राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी
उमरोलीत राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

उमरोलीत राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

sakal_logo
By

rat०२१९.TXT

(टुडे पान ३ साठी)

उमरोलीत राज ठाकरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

उपतालुकाध्यक्ष सुनील हळदणकर ः कार्यकर्ता जोडो अभियान राबवणार
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २ ः गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिपळूण तालुक्यातील उमरोली येथे जंगी स्वागत होणार आहे. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी रामपूर विभागाच्यावतीने करण्यात आल्याची माहिती चिपळूण उपतालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी दिली.
राज ठाकरे यांचे गुहागरमध्ये ४ डिसेंबरला आगमन होईल व ५ ला सकाळी ९ वा. गुहागर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन झाल्यावर राज ठाकरे चिपळूणकडे रवाना होणार आहेत. या दरम्यान, चिपळूण-गुहागर मार्गावरील उमरोली येथे त्यांचे स्वागत सुनील हळदणकर करणार आहेत. रामपूर, कळंबट विभागातील कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश करून घेतला जाईल व पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी ते चर्चा करतील. या निमित्ताने रामपूर विभागाच्यावतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी करून वातावरणनिर्मिती करण्यात येणार आहे. दरम्यान, हळदणकर यांनी रामपूर व कळंबट विभागात मनसे पक्षाच्या वाढीसाठी कार्यकर्ता जोडो अभियान सुरू केले आहे. त्यांच्या आव्हानाला अनेक तरुणांनी प्रतिसाद देऊन मनसेत प्रवेश केला आहे. विद्यार्थीसेनेचीही फळी त्यांनी उभी केली असून संघटना तयार करणार असल्याचे सांगितले.