
राजापूर-एडस रुग्णाला सन्मान देऊया
rat2p22.jpg
66033
राजापूरः खापणे महाविद्यालयामध्ये बोलताना डॉ. व्ही. एस. पाटील. या वेळी उपस्थित प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम आणि मान्यवर.
------------
एडस रुग्णाला सन्मान देऊया
डॉ. व्ही. एस. पाटील; खापणे महाविद्यालयात एडस सप्ताह
राजापूर, ता. २ः ‘एड्स रुग्णांना सहानुभूतीची नाही तर सन्मान देण्याची गरज आहे. एड्सचा रोगी हा रोगापेक्षा समाजाच्या नजरांनीच अधिक घायाळ होतो. म्हणूनच एड्स रुग्णाला आपल्या नजरांनी घायाळ न करता त्यांना सन्मान देऊया’, असे आवाहन डॉ. व्ही. एस. पाटील यांनी केले.
तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवायोजना विभागातर्फे ‘एड्स सप्ताहा’चे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. पाटील यांनी वरील प्रतिपादन केले. या वेळी प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. डी. देवरूखकर आदी उपस्थित होते. डॉ. मेश्राम यांनी आरोग्य हे महत्वाचे असून तरुणाईने ते सांभाळले पाहिजे. मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने एड्स रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. रोगाच्या समूळ उच्चाटनासाठी तरुणाईने प्रबोधनपर उपक्रमातून जनजागृती करावी. तत्पूर्वी, कार्यक्रम अधिकारी प्रा. देवरूखकर यांनी सप्ताहाअंतर्गत होऊ घातलेल्या निबंधस्पर्धा, व्याख्यान, गटचर्चा, पोस्टर प्रदर्शन, प्रबोधनपर पत्रकांचे वाटप आदी उपक्रमांची सविस्तर माहिती प्रस्तावना करताना दिली. यावेळी नरेश पाचलकर उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता धुळप, तर आभार प्रतीक्षा फटकारे हिने मानले.