नेमळे येथील संध्या राऊळ वाचक स्पर्धेमध्ये प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेमळे येथील संध्या राऊळ
वाचक स्पर्धेमध्ये प्रथम
नेमळे येथील संध्या राऊळ वाचक स्पर्धेमध्ये प्रथम

नेमळे येथील संध्या राऊळ वाचक स्पर्धेमध्ये प्रथम

sakal_logo
By

66046
मळगाव ः येथील खानोलकर वाचन मंदिरात विजेत्यांसमवेत मान्यवर.

नेमळे येथील संध्या राऊळ
वाचक स्पर्धेमध्ये प्रथम
सावंतवाडी ः (कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर व सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय, कुडाळतर्फे सावंतवाडी तालुकास्तरीय वाचक स्पर्धा नुकतीच वाचनालयाच्या सभागृहात झाली. या स्पर्धेत नेमळे येथील संध्या राऊळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय विभागून कोलगाव येथील अंकिता नाईक व केसरी येथील प्रगती परांजपे तर तृतीय क्रमांक सीमा पंडित यांनी मिळविला. स्पर्धेचे परीक्षण विठ्ठल कदम, भरत गावडे यांनी केले. या वाचक स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी परीक्षक कदम यांनी, ज्या स्पर्धकांनी या वाचन स्पर्धेत भाग घेतला अणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यावर वाचन करून आलेत, ते सर्वजण या स्पर्धेतील यशाचे मानकरी आहेत. निर्णय काहीही असो, असे सांगून खानोलकर वाचन मंदिरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची व वाटचालीबाबत गौरवोद्गार काढले. या सावंतवाडी तालुकास्तरीय वाचक स्पर्धेसाठी ‘मधु मंगेश कर्णिक यांचे साहित्य’ हा विषय होता. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाची जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली. ही स्पर्धा ४ डिसेंबरला कुडाळ येथे होणार आहे. यावेळी उदय खानोलकर वाचन मंदिरच्यावतीने यशस्वी स्पर्धकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
-----------
66065
वायंगणी ः येथील मठातील श्री स्वामी समर्थांची मूर्ती.

वायंगणीतील मठाचा ४ला वर्धापन दिन
आचरा ः वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाचा दहावा वर्धापन दिन रविवार (ता.४) पासून सुरु होत आहे. तीन दिवस चालणारया या सोहळ्यात स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त रविवारी सकाळी आठपासून वायंगणी गावात पालखी परीक्रमा होणार आहे. रात्री स्थानिक भजनांचे आयोजन केले आहे. ५ ला पहाटे पाच वाजता राजोपचार पूजा, दुग्धाभिषेक, सकाळी नऊ वाजता सामुदायिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे. दुपारी महाप्रसाद तर रात्री स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. ६ ला सकाळी सत्यदत्त महापूजा, सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी हळदीकुंकू समारंभ, त्यानंतर स्थानिक भजने तर रात्री राज्यस्तरीय एकेरी व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाकडून केले आहे.
--
66064
चिंदर ः येथे डाळपस्वारीला सुरुवात झाली.

चिंदर येथे डाळपस्वारीला प्रारंभ
आचरा ः चिंदर (ता.मालवण) गावची डाळपस्वारी बुधवारपासून श्री देव रवळनाथ मंदिरातून सुरु झाली आहे. दरवर्षी यात्रोत्सवापूर्वी डाळपस्वारीला सुरुवात होते. श्री देव रवळनाथ मंदिरातून निघालेली श्रींची स्वारी सातेरी मंदिरपासून आकारी ब्राह्मण देव मंदिर येथे विसावते. गुरुवारी सायंकाळी आकारी ब्राम्हण देव मंदिरातून चिंदर बाजार पेठमार्गे खरीवाडी येथील पावणाई मंदिरात रात्री ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पोहोचली. येथे तीन दिवस राहून चिंदर कुंभारवाडीतून श्री देव रामेश्वर मंदिर येथे विसावणार आहेत. यानंतर यात्रे दिवशी रात्री श्रींची स्वारी भगवती मंदिरात पोहोचणार आहे.
---
66034
कोलगाव ः स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.

स्टेपिंग स्टोनचे ज्युदो स्पर्धेत यश
सावंतवाडी ः संजु परब मित्रमंडळ, सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे आकिदो असोसिएशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरिय भव्य ज्युदो स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल कोलगावच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. आराध्य नाटेकर (सुवर्णपदक), अस्मी तेंडोलकर व मनवा साळगांवकर यांनी रौप्यपदक तर वैष्णव सावंत, देवांश यादव व सोहम देशमुख यांनी कांस्यपदक मिळवून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेत विद्यार्थ्याना दिनेश जाधव यांचे प्रशिक्षण लाभले. रुजुल पाटणकर यांनी विद्यार्थ्यांचे शाळेच्यावतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
------------
शासकीय सदस्यासाठी अर्जाचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः केंद्राच्या बाल न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ कलम ५४ व राज्य शासन नियम २(२१) नूसार नोंदणीकृत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह, ओरोस या संस्थेच्या तपासणीसाठी अशासकीय सदस्य १ (बाल हक्क, संगोपन संरक्षण कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समुहाचा १ सदस्य) नेमावयाचा आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक १२ डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. अटी शर्ती ः अशासकीय व्यक्ती किमान पदवीधर,बाल हक्क, काळजी संरक्षण क्षेत्रातील किमान १० वर्षाचा अनुभव आवश्यक, सदस्यांचे वय ३५ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त नसावे. अशासकीय सदस्यांचा कालावधी नेमणुकीपासून ३ वर्षाचा राहील. या अटी शर्तीनूसार पात्र व इच्छुक उमेदवारांनी १२ डिसेंबरपर्यंत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग प्रशासकीय इमारत, ए‍ विंग, तळमजला ओरोस, सिंधुदुर्गनगरी या कार्यालयमध्ये अर्ज सादर करावयाचे आहेत. विहित मुदतीमध्ये आलेल्या अर्जाचा विचार केला जाईल, असे आवाहन केले आहे.
--
माजगावात ७ ला दत्त जयंती
सावंतवाडी ः माजगाव येथील दत्तमंदिरात ७ ला दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. ७ ला सकाळी पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होणार असून रात्री १२ वाजता श्रींचा जन्म उत्सव होणार आहे. ८ ला सकाळपासून धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी १ वाजता महाप्रसादचे आयोजन केले आहे. या उत्सवास भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गुरुदेव दत्त देवस्थानकडून केले आहे.