‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले आमदार नीतेश राणेंचे आभार ‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले आमदार नीतेश राणेंचे आभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले 
आमदार नीतेश राणेंचे आभार
‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले 
आमदार नीतेश राणेंचे आभार
‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले आमदार नीतेश राणेंचे आभार ‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले आमदार नीतेश राणेंचे आभार

‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले आमदार नीतेश राणेंचे आभार ‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले आमदार नीतेश राणेंचे आभार

sakal_logo
By

66050
कणकवली : येथील ओम गणेश निवासस्थानी जिल्ह्यातील आरोग्‍य सेविकांनी आमदार श्री.राणे यांचे आभार मानले.

‘त्‍या’ आरोग्य सेविकांनी मानले
आमदार नीतेश राणेंचे आभार

पुन्हा सेवेत घेतल्याने समाधान व्यक्त

कणकवली, ता.२ : राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान अंतर्गत सेवामुक्‍त करण्यात आलेल्‍या जिल्ह्यातील २१ आरोग्‍य सेविकांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. हा प्रश्‍न मार्गी लावल्‍याबद्दल या परिचारिकांनी आमदार नीतेश राणे यांचे आभार मानले.
कोरोना संसर्ग कालावधीत कंत्राटी स्वरूपात भरती करण्यात आलेल्या राज्‍यातील ५९७ आरोग्‍य सेविकांचे ११ महिन्यांचे कंत्राट संपल्‍यानंतर त्‍यांना कायम करण्यात आले नाही. त्यामुळे उपासमारीचे संकट ओढवलेल्या आरोग्य सेविकांनी आपणास सेवेत कायमस्वरूपी म्हणून दाखल करून घेण्याची मागणी केली होती. राज्‍यातील ५९७ पैकी सिंधुदुर्गातील २१ आरोग्‍य सेविकांनी याबाबत आमदार नीतेश राणेंकडे दाद मागितली होती. दरम्‍यान, राज्यात सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने आरोग्य सेविकांची मागणी लक्षात घेऊन ५९७ आरोग्य सेविकांना कायमस्वरुपी शासनसेवेत घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय होण्यामध्ये आमदार श्री.राणे यांचेही मोठे योगदान असल्‍याने जिल्ह्यातील त्‍या २१ आरोग्‍य सेविकांनी ओम गणेश येथील निवास्थानी येऊन आमदार श्री.राणे यांचे आभार मानले.