
अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस उपक्रमांनी
66056
सावंतवाडी ः अर्चना घारे-परब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पदाधिकारी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
अर्चना घारे-परब यांचा
वाढदिवस उपक्रमांनी
सावंतवाडी, ता. २ ः राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाभरातून राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांनी उपस्थित राहत त्यांना शुभेच्छा दिल्या. अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून येथील बेरोजगारांसह महिला बचत गटांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम या ठिकाणी राबविण्याचा आमचा मानस आहे. लवकरच त्याची सुरुवात होईल, असा विश्वास सौ. घारे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातही वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष अॅड. सायली दुभाषी, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व्यापार दर्शना बाबर-देसाई, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका उपाध्यक्ष काशिनाथ दुभाषी, तालुका चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकुब शेख, जिल्हा सरचिटणीस उद्योग व्यापार नियाज शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर, ऑगस्तीन फर्नांडिस, व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, रोहन परब, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, फैज शेख, विनायक (दिपू) परब, विनायक परब, वैभव परब, मनोज वाघमोरे आदी उपस्थित होते.