खेड तालुक्यात कुणबी जोडो अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड तालुक्यात कुणबी जोडो अभियान
खेड तालुक्यात कुणबी जोडो अभियान

खेड तालुक्यात कुणबी जोडो अभियान

sakal_logo
By

rat2p26.jpg
66054
खेडः शहरातून काढण्यात आलेल्या कुणबी जनजागृती रॅलीतील सहभागी बांधव.
-------------
खेडमध्ये कुणबी जोडो
अभियान रथाचे स्वागत
खेड, ता. २ः कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने संविधान दिनापासून कुणबी जोडो अभियान राबवण्यात आले. अभियानाचा रथ चौथ्या दिवशी खेडमध्ये आंबडसमधून खेड तालुक्यातील विविध भागातून नेण्यात आला. विविध ठिकाणी कॉर्नर सभा झाल्या. कुणबी समाज संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
आंबडस येथे कुणबी समाजबांधव आणि सहागाव कुणबी संघटनेचे पदाधिकारी यांनी ढोल-ताशे आणि लेझिमच्या खेळत जनजागृती रथाचे स्वागत केले. लोटेमाळमार्गे रॅली लवेल विभागात पोहोचली. महामार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली. महिला आणि बाल लेझिम पथक यांनी लवेल गटातर्फे अभियान यात्री आणि पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. दाभिळनाका येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. कुणबी सेवा संघ लवेलचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत चांदिवडे, आग्रे, महेश गोवळकर, मामा तळेकर, मनोहर पाडावे, शांताराम चिनकटे, दीपक शिगवण आणि डॉ. श्रेया चांदिवडे यांनी सभेचे नियोजन केले होते.
अभियान रॅली खेड येथील भरणेनाका येथे पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून रॅलीचे रूपांतर कॉर्नर सभेत झाले. या वेळी समाजनेते शंकर कांगणे, भरणेचे सरपंच संदीप खेराडे, परशुराम लांबे, जयराम चव्हाण, शशिकांत शिंदे, प्रवीण शिबे, श्रीकांत कदम, सुजित शिंदे, प्रवीण गिते, पांडुरंग शिंदे, संतोष गोमाले, बुरटे, नंदिनी खांबे उपस्थित होत्या. त्यानंतर रॅली खेड मुख्य बाजारपेठमार्गे खारी येथे नेण्यात आली. खारी येथे सभेसाठी अकरा गाव कुणबी संघटनेचे अध्यक्ष बाबा पाटील व कुणबी बांधव शेतकरी संघाचे अध्यक्ष अनंत गोरिवले, रवींद्र हरावडे, वैराग, शरद कदम, बहुतुले, कंचावडे उपस्थित होते. कुणबी समाजोन्नती संघ अध्यक्ष भूषण बरे आणि अशोक वालम यांच्या नेतृत्वात सुसेरी, बहिरवली फाटा, चिंचघरमार्गे रॅली दस्तुरी येथे आली. या वेळी आत्माराम कदम, मंगेश मांडवकर, राजू मोहने, सरपंच भुवड, शिगवण आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दस्तुरी येथे कॉर्नर सभेत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.