उगवाई नदीवर श्रमदानातून बाधला बंधारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उगवाई नदीवर श्रमदानातून बाधला बंधारा
उगवाई नदीवर श्रमदानातून बाधला बंधारा

उगवाई नदीवर श्रमदानातून बाधला बंधारा

sakal_logo
By

66073
फोंडाघाट ः येथील उगवाई नदीवर श्रमदानातून बांधलेला बंधारा.

उगवाई नदीवर विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बांधला बंधारा

विधायक कार्य; फोंडाघाट महाविद्यालयाच्या छात्र सेना, एनसीसी विभागाचा पुढाकार

फोंडाघाट,ता. २ ः येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटच्या राष्ट्रीय छात्र सेना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या श्रमदानातून फोंडाघाट येथील उगवाई नदीच्या पात्रावर वनराई बंधारा बांधला. फोंडाघाट गावाच्या पूर्वेकडील सह्याद्री डोंगर रांगाच्या कुशीतून वाहणाऱ्या उगवाई नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक होणार असल्याने वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार असून ग्रामस्थांना वापरण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
दरवर्षी मॉन्सून माघारी परतल्यानंतर फोंडाघाट गावात पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. कारण भूजलपातळी खालावली जात असते. साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ओहोळात पाणी वाहत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. वाया जाणारा पाण्याचा साठा रोखून पाळीव प्राणी आणि वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट येथील राष्ट्रीय छात्र सेना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत वनराई बंधारा बांधण्याचा निश्चय केला होता.
दरम्यान, हा बंधारा बांधण्यासाठी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे तसेच गावातील नागरीकांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. संस्थेचे संचालक रंजन नेरूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या नाष्ट्याची सोय केली. प्राचार्य डॉ. विष्णु फुलझेले यांनी उपक्रमास प्रोत्साहन दिले. तर या बंधाऱ्याच्या यशस्वीतेसाठी एन. सी.सी. अधिकारी डॉ. राज ताडेराव व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बालाजी सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली एन.सी. सी. कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयसेवक यांनी परिश्रम घेतले.
--
हजारो लिटर पाण्याचा साठा शक्य
महाविद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांनी श्रमदानातून बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात केली होती. दुपारी बारापर्यंत सुमारे पन्नास फूट लांबीचा वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे नदीतून वाहणारे हजारो लिटर पाण्याचा साठा बंधाऱ्यात होणार आहे. वनराई बंधाऱ्यात एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याचा साठा शिल्लक राहणार असल्याने गावातील नागरीक व जंगलातील वन्यप्राणी व पक्षाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.