सावंतवाडीत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत 
आरोग्य शिबिर
सावंतवाडीत आरोग्य शिबिर

सावंतवाडीत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

सावंतवाडीत
आरोग्य शिबिर
सावंतवाडी ः मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त येथील तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी उद्या (ता.३) सकाळी नऊला येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन म्हणजे ३ डिसेंबर हा दिवस पत्रकार आरोग्य तपासणी दिवस म्हणून दरवर्षी साजरा होतो. यावर्षी ३ डिसेंबरला तब्बल १० हजार पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेनं सोडला आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन एस. एम. देशमुख यांनी केले आहे. पत्रकार मित्रांनी शिबिराला उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, सचिव प्रसन्न राणे व खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.
--
राष्ट्रवादीतर्फे
होणार निवडी
कुडाळ ः राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या सूचनेनुसार आणि महाराष्ट्र प्रदेश सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक कल्पेश चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी सिंधुदुर्गाच्या जिल्हा कार्यकारणी सुरू करत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रतिक सावंत यांनी दिली. तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष व महाविद्यालय अध्यक्ष पदाची निवड करण्यात येणार आहे. देवगड, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वैभववाडी, वेंगुर्ले या तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सर्व इच्छुक सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपले अर्ज २० डिसेंबरपर्यंत nsc.sindhudurg@gmail.com या मेल आयडीवर पाठवावेत, असे आवाहन प्रतिक सावंत यानी केले आहे.
------------
सावंतवाडीत
रक्तदान शिबिर
सावंतवाडी ः महेंद्र अॅकॅडमीचे संस्थापक महेंद्र पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महेंद्र अॅकॅडमी व युवा रक्तदाता संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. येथील उप जिल्हा रुग्णालयात रविवारी (ता.४) सकाळी दहाला या रक्तदान शिबिरास सुरूवात होणार आहे.‌(स्थळ ः कॉटेज हॉस्पिटल रक्तपेढी) यावेळी रक्तदात्यांनी उपस्थित राहत रक्तदान करण्याचे आवाहन महेंद्र पेडणेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी केले आहे.
--
लोकशाही दिन
५ डिसेंबर रोजी
सिंधुदुर्गनगरी ः डिसेंबर महिन्यातील लोकशाही दिन हा महिन्याच्‍या पहिल्या सोमवारी (ता.५) दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार असल्याची माहिती, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती यांनी दिली.