कणकवलीत राज ठाकरेंचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत राज ठाकरेंचे स्वागत
कणकवलीत राज ठाकरेंचे स्वागत

कणकवलीत राज ठाकरेंचे स्वागत

sakal_logo
By

केवळ फोटो
66104
राज ठाकरेंचे स्वागत
कणकवली ः राज ठाकरे यांचे येथील पटवर्धन चौकात कार्यकत्यांनी जोरदार स्वागत केले. (छायाचित्र ः प्रथमेश जाधव)
--
असलदे रामेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह
कणकवली ः असलदे (ता.कणकवली) येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात हरिनाम सप्ताह उद्या (ता.३ ) होणार आहे. सकाळपासूनच चव्हाटा येथे घटस्थापना, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. असलदे गावठण येथील चव्हाट्यावर दरवर्षी प्रमाणे हरिनाम सप्ताह निमित्ताने सकाळी ९ वाजता घटस्थापना,वारकरी भजन,त्यानंतर दुपारी ग्रामस्थांनी व माहेरवाशिणी आपल्या ग्रामदैवताची ओटी भरण्याचा कार्यक्रम, मनोभावे पूजा केली. रात्री ८ ते १० वाजता वारकरी सांप्रदायिक मंडळ शिरगाव यांचे दिंडी भजन,सप्ताहानिमित्त संपूर्ण चव्हाटा परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला आहे. रात्री दहाला पंचक्रोशीतील वारकरी भजने होणार आहेत. भाविकांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
सातशे चालकांवर उपासमारीची वेळ
नवीन पनवेल ः केंद्र व राज्य सरकारने सात आसनी स्कूल व्हॅनची नोंदणी बंद केली आहे. या निर्णयाचे पनवेल परिसरात पडसाद उमटत असून गल्लीबोळामध्ये जाऊन विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या सातशेहून अधिक चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शिवाय पालकांच्या वेळेचा देखील अपव्यय होणार असल्याने सात आसनी स्कूल व्हॅनला परवानगी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पनवेल परिसरामध्ये मोठ्या संख्येने खासगी शैक्षणिक संस्था आहेत. हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. या मुलांना घरून शाळेत आणि शाळेतून घरी ने-आण करण्यासाठी स्कूल व्हॅनचा वापर होतो. काही शाळांच्या बसेस आहेत, तर काही ठिकाणी खासगी ठेकेदार नेमून बसेस चालवल्या जातात. मात्र पनवेल परिसरातील रस्ते अरुंद असल्यामुळे अनेकांकडून स्कूल व्हॅनलाच पंसती दिली जाते. अशातच आता केंद्र आणि राज्य सरकारने सात आसनी स्कूल व्हॅनच्या नोंदणीची प्रक्रिया बंद केली आहे. त्यामुळे पनवेलमधील सातशेहून अधिक चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्कूल बसमुळे वाहतूक कोडींचा प्रश्न निर्माण होणार आहे.
--------
डिझेल परताव्यासाठी आंदोलनाची हाक
उरण ः करंजा, मोरा तसेच उरणच्या ग्रामीण भागातील मच्छीमार संस्थांच्या सदस्यांना शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून डिझेल परताव्याची ३७ कोटींची रक्कम अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून थकीत परताव्यासाठी मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य शासनाकडून मच्छीमारांना मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या डिझेलवर अनुदान दिले जाते. ही देयके जिल्हा व जिल्ह्यातून राज्य मत्स्यव्यवसाय विभागाकडे पाठवली जातात. त्यानंतर मंत्रिस्तरावर या देयकांना मंजुरी मिळाल्यानंतर देयकांची रक्कम मच्छीमारांना दिली जाते. मात्र २०१८ पासून डिझेल परताव्याची देयके थकीतच असल्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली आहेत. रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांना बोटीच्या डिझेल परताव्यापोटी ४२ कोटींची रक्कम थकीत असून मत्स्यव्यवसाय विभागाने ५ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
------
पनवेल महापालिकेच्या बँकांना सूचना
नवीन पनवेल : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत महापालिकेच्या वतीने पथविक्रेत्यांना दहा हजारांचे भांडवल साह्य म्हणून खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या या उपक्रमानुसार संबंधित बँकांनी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना सहकार्य करून तत्काळ त्यांची कर्जे मंजूर करावे, अशा सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी उपस्थितांना दिल्या.
दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (डेएनयुलएम) विभागाच्यावतीने सर्व बँक प्रतिनिधींची बैठक नुकतीच पालिका मुख्यालयात झाली होती. या बैठकीत उपायुक्त कैलास गावडे, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उपायुक्त कैलास गावडे यांनी बँकांकडे पेंडिंग असलेल्या केसेसविषयी माहिती देऊन, बँकांनी महापलिकेला सहकार्य करण्याविषयी सूचित केले. ज्या पथविक्रेत्यांचे बँकेत खाते नाही त्यांना झिरो बॅलन्सवर खाते उघडण्यास मदत करावी. संबंधित लाभार्थ्यांना सतत बँकेमध्ये हेलपाटे मारण्यास लागू नये, याची काळजी घ्यावी, अशा सूचना उपस्थितांना केली.
---
टेम्‍पोची दुचाकीला धडक
पोलादपूर ः पोलादपूर-महाबळेश्वर-वाई राज्य मार्गवर टेम्‍पोचालकाने भरधाव वेगाने येत दुचाकीला धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. पोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाताना मौजे पायटा बौद्धवाडी गावाजवळ चालकाने रस्‍त्‍याच्या स्‍थितीकडे दुर्लक्ष करीत अतिवेगाने विरुध्द दिशेने येत टेम्‍पो चालवला. आणि महाबळेश्‍वरहून पोलादपूरकडे जाणार्‌या दुचाकीला जोरदार ठोकर दिली. अपघातात दुचाकीस्वार व सहकारी जखमी झाले. याबाबत पोलादपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---