
भरणेत चौपदरीकरणासाठी सपाटीकरण सुरू
rat०२२४.txt
(पान २ साठी)
फोटो ओळी
-rat२p३२.jpg
६६०६८
ः खेड ः जगबुडी पुलानजीक चौपदरीकरणासाठी सुरू असलेले सपाटीकरण.
भरणेत चौपदरीकरणासाठी सपाटीकरण सुरू
एकेरी वाहतूक सुरू ; वाहतूक कोंडीने वाहनचालक हैराण
सकाळ वृत्तसेवा ः
खेड, ता. २ ः मुंबई-गोवा महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. भरणे येथील जगबुडी पुलानजीकचे चौपदरीकरण तांत्रिक कारणांमुळे रखडले होते. अखेर ठेकाधारक कंपनीने चौपदरीकरणासाठी भरणे जगबुडी पुलानजीक सपाटीकरणाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे चिपळूणच्या दिशेने जाणारा एक मार्ग बंद झाल्याने एकेरी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. यामुळे एकेरी मार्गावर वाहतूककोंडी होत आहे.
महामार्गावरील चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. भरणे येथील उड्डाणपुलासह भुयारी मार्गदेखील वाहतुकीसाठी खुला झाला आहे; मात्र भरणे जगबुडी पुलानजीक चौपदरीकरण काही तांत्रिक बाबींमुळे रखडले होते. या बाबींची पूर्तता करत ठेकाधारक कंपनीने चौपदरीकरणाच्या कामासाठी सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे. या कामानेही गती घेतली आहे. या कामासाठी चिपळूणच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. एकेरी मार्गाचा अवलंब सुरू असल्याने वाहने हाकताना वाहनचालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.