योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्यास उत्पन्नात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्यास उत्पन्नात वाढ
योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्यास उत्पन्नात वाढ

योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्यास उत्पन्नात वाढ

sakal_logo
By

rat०२३५.txt

बातमी क्र..३५ (पान २ साठी)

फोटो ओळी
-rat२p३९.jpg-
६६११०
रत्नागिरी ः कृतिसंगम कार्यशाळेला उपस्थित शेतकरी आणि अधिकारी.

योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचल्यास उत्पन्नात वाढ

सीईओ पुजार ; कृतिसंगंम कार्यशाळेला प्रतिसाद

पावस, ता. २ ः शासनामार्फत विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवल्या गेल्या तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल. त्यामुळे अशा पद्धतीच्या कृतिसंगम कार्यशाळा गावोगावी आयोजित करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी केले.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने कृतिसंगम कार्यशाळा झाली. कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना व बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प या कृषी विभागाकडील योजनांसह इतर सर्व कृषिसंलग्न विभागाच्या योजनाबाबत कृतिसंगम कार्यशाळेचे आयोजन (कै.) शामराव पेजे सभागृहात करण्यात आले होते. कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कृषी पायाभूत निधी योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबडे, प्रकल्प उपसंचालक आत्मा उर्मिला चिखले, भाग्यश्री नाईकनवरे, एन. डी. पाटील, मंगेश कुलकर्णी, मिलिंद जोशी, संजय शेंडे, अमरीश मेस्त्री आदी उपस्थित होते.