नाणीजला ट्रक-कारच्या धडकेत 1 ठार 5 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाणीजला ट्रक-कारच्या धडकेत 1 ठार 5 जखमी
नाणीजला ट्रक-कारच्या धडकेत 1 ठार 5 जखमी

नाणीजला ट्रक-कारच्या धडकेत 1 ठार 5 जखमी

sakal_logo
By

rat२p५१.jpg
६६१४८
नाणीजः येथे झालेल्या अपघातातील ट्रक व बाजूला झाडीत कोसळलेली मोटार.
-rat२p४६.jpg ः
६६१२८
सुवर्णा नागवेकर
-----------
नातीच्या लग्नाला निघालेली
वृद्धा अपघातात ठार
रत्नागिरी, ता. २ ः रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर नाणीज येथील इरमलवाडी येथे साखरपाहून रत्नागिरीकडे येणारी मोटार समोरून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकवर आदळली. या भीषण अपघातात मोटार रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या अपघातात पाचजण जखमी तर नातीच्या लग्नाला येणाऱ्या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शुक्रवारी (ता. २) दुपारी १ वाजता नाणीज-इरमलवाडी येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार त्यातील एकजण ठार व पाचजण गंभीर जखमी झाले. सुवर्णा शिवराम नागवेकर (वय ७०) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक मंजुनाथ शिद्राय पाटील (वय ३८) हे ट्रक (एमएच-०९-सीए-३१२४) घेऊन जयगडहून सोलापूरला चालले होते. नाणीज येथील इरमलवाडी येथील वळणावर या समोरून येणाऱ्या मोटारीला (एमएच-०१-डीपी-२६५८) ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटार रस्त्याच्या कडेला खाली फेकली गेली. कार विक्रांत वारंग चालवत होते. या कारमध्ये सहाजण प्रवास करत होते. सर्वजण साखरप्यावरून रत्नागिरीकडे लग्नासाठी निघाले होते. या अपघातात सुवर्णा शिवराम नागवेकर (रा. वाडावेसवरांड, फणसवणे-भंडारवाडी, संगमेश्वर) यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात हरिश्चंद्र वारंग (६५), हर्षदा हरिश्चंद्र वारंग (६०), विक्रांत हरिश्चंद्र वारंग (३०), सुनील पेडणेकर (५५), सुषमा सुनील पेडणेकर (५०) (सर्व रा. खारघर, मुंबई) हे जखमी झाले आहेत.
----
चौकट....
पालकमंत्र्याच्या आदेशानंतरही कार्यवाही नाहीच
नाणीज येथील इरमलवाडी येथे नेहमी अपघात होत असतात. या अपघातामध्ये अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. रत्नागिरी येथे ४ नोव्हेंबर २०२२ ला जनता दरबार झाला. त्या वेळी राजन बोडेकर यांनी संबंधित अपघातग्रस्त वाकण प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने तेथे उपाययोजना करायला सांगितल्या होत्या; मात्र पुढे त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. वेळीच लक्ष दिले असते तर आजचा हा अपघात कदाचित टाळला असता.