
राजकीय पक्षांनी दखल घेण्यासारखे संघटन करू
rat०२४०.txt
(पान ३ साठी)
फोटो ओळी
-rat२p४३.jpg ः
६६१२५
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात कुणबी समाजोन्नती संघातर्फे काढण्यात आलेली रॅली.
-rat२p४५.jpg-
६६१२७
रत्नागिरी ः शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कुणबी जोडो अभियान राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम. सोबत भूषण बरे, नंदकुमार मोहिते, अॅड. सुजित झिमण, अरविंद डाफळे, शांताराम मालप आदी.
राजकीय पक्षांनी दखल घ्यावी संघटन करू
अशोक वालम ; कुणबी जोडो अभियानांतर्गत रत्नागिरीत रॅली
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. २ : जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे ६५ टक्के एवढा कुणबी समाज आहे. त्याला एका झेंड्याखाली आणण्यासाठी कुणबी जोडो अभियान सुरू केले आहे. याला चांगला प्रतिसाद मिळाला असून माजी खासदार शामराव पेजे यांनी तेव्हा जी क्रांती घडविली ती क्रांती २०२४ पर्यंत घडवून राजकीय पक्षांना दखल घ्यावी लागेल, असे संघटन करू, असा ठाम विश्वास ‘कुणबी जोडो अभियान'' राजकीय संघटन समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी व्यक्त केला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भूषण बरे, रत्नागिरीचे नंदकुमार मोहिते, अॅड. सुजित झिमण, सरचिटणीस अरविंद डाफळे, शांताराम मालप, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ही संस्था आज १०२ वर्षांची वाटचाल करत आहे. या संस्थेने समाजाच्या प्रलंबित पश्नांसाठी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला. मात्र या समाजाचे मुलभूत पश्न शासनस्तरावरून खितपत राहिलेले असल्याची खंत यावेळी अध्यक्ष भूषण बरे यांनी व्यक्त केली. कुणबी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी, मागण्यांसाठी या कुणबी जोडोच्या माध्यमातून समाजबांधवांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे. जातनिहाय, जनगणना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, बेदलखल कुळ, अशा अनेक पश्नांबाबत समाजात जागृती करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आल्याचे सरचिटणीस अरविंद डाफळे यांनी सांगितले. कुणबी समाजाचे प्रलंबित प्रश्न आजही खितपत पडले आहेत. जातनिहाय जनगणना, लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण हवे जे राजकीय पक्षाचे लोक अन्यायकारक कायदे लादण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भूमिपुत्र उद्ध्वस्त होत आहेत. त्यासाठी हे अभियान, सदस्यनोंदणी अभियान हाती घेण्यात आल्याचे नंदकुमार मोहिते यांनी सांगितले.
रत्नागिरीत रॅली
रत्नागिरी शहरात कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा रत्नागिरी ग्रामीण यांच्यावतीने भव्य मोटार व दुचाकी रॅली काढण्यात आली. मारूती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळनाका येथील लोकनेते शामराव पेजे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली पुढे तालुक्यात मार्गस्थ झाली.