चिपळूण शहरातील विकासकामांसाठी 170 कोटींची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण शहरातील विकासकामांसाठी 170 कोटींची घोषणा
चिपळूण शहरातील विकासकामांसाठी 170 कोटींची घोषणा

चिपळूण शहरातील विकासकामांसाठी 170 कोटींची घोषणा

sakal_logo
By

rat०२४९.txt

बातमी क्र..४९ (पान ३ साठीमेन)

फोटो ओळी
- rat२p५२.jpg ः
६६१४९
चिपळूण ः पालिकेत आढावा बैठक घेताना पालकमंत्री उदय सामंत.

चिपळूण शहरातील विकासकामांसाठी १७० कोटींची घोषणा

उदय सामंत ; तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या बैठकीत सूचना
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २ ः चिपळूण शहराच्या विकासासाठी नगरपालिकेला आवश्यक असणारा कोट्यवधीचा निधी शासनाच्या विविध योजनेतून उपलब्ध केला जाईल; मात्र, प्रशासनाने विकासकामांचे परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच शहरातील कामांसाठी १७० कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले.
उद्योगमंत्री सामंत यांनी शहराच्या नळपाणी योजनेसाठी १३९ कोटी, पालिकेच्या इमारत बांधकामासाठी २७ कोटी, नगरोत्थानमधून साडेचार कोटी, गोविंदगड सुशोभीकरणासाठी आराखड्याप्रमाणे आवश्यक निधी व शहरातील सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी आवश्यकतेनुसार शंभर ते दोनशे कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले. त्यासाठी प्रस्ताव तातडीने देण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला केली.
पालकमंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. २) चिपळूण दौऱ्यावर आले. या वेळी त्यांनी शहरातील पूर्ण झालेल्या विविध विकासकामांची उद्घाटने केली. त्यापूर्वी त्यांनी सुरवातीला सकाळी पालिकेत प्रशासकीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहरातील विविध विकासकामांचे प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावावर चर्चा करताना संबंधित प्रस्तावाची सद्यःस्थिती जाणून घेतली. त्या अनुषंगाने माहिती देताना पालकमंत्री सामंत म्हणाले, गतवर्षीच्या महापुरात सर्वाधिक सामाजिक व शासकीय स्तरावरील मदत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. त्यांच्या आदेशानुसार शहर पुन्हा उभे करण्याकरिता प्रशासकीय यंत्रणेला तातडीने मदतीला पाठवले. शहरात होणाऱ्या विकासकामांकरिता प्रशासनाने आवश्यक निधी तांत्रिक मंजुरीसह त्याचे प्रस्ताव पाठवून द्यावेत. त्याला शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध केला जाईल.
शहरातील सर्व रस्ते काँक्रिटचे करताना आवश्यक तेथे पूरपरिस्थितीचा विचार करून स्लॅब ड्रेन तंत्रज्ञानाच्या वापराचा परिपूर्ण डीपीआर प्रस्ताव तयार करा, अशी सूचना देऊन शहराच्या पाणीयोजनेतील अडचणी व तांत्रिक अडथळे दूर करण्याकरिता केंद्र शासनाच्या ''अमृत- २'' योजनेंतर्गत १३९ कोटी रुपये मंजूर केले जातील. त्यासाठी संबंधित विभागाने परिपूर्ण प्रस्ताव करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, स्वामी मठ मार्कंडी रस्ता, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, शहरातील बुरूमतळी येथील विश्रामगृह विकसित करण्यासंदर्भात सद्यःस्थितीची माहिती घेऊन कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधीसाठी पूर्ण प्रस्ताव करण्याच्या पुन्हा सूचना केल्या.