सावंतवाडीतील बेपत्ता महिला अखेर सापडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील बेपत्ता
महिला अखेर सापडली
सावंतवाडीतील बेपत्ता महिला अखेर सापडली

सावंतवाडीतील बेपत्ता महिला अखेर सापडली

sakal_logo
By

सावंतवाडीतील बेपत्ता
महिला अखेर सापडली
सावंतवाडी, ता. २ ः सालईवाडा येथील मिलाग्रीन फर्नांडिस ही महिला काल (ता.१) दुपारपासून बेपत्ता होती. जळाऊ लाकडासाठी नरेंद्र डोंगर येथे गेली असता ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिचा शोध सुरू होता. अखेर सावंतवाडीतील सामाजिक बांधिलकी टीमला तिचा शोध घेण्यात यश आले. त्यानंतर तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मिलाग्रीन यांनी काल पूर्ण रात्र नरेंद्र डोंगराच्या घनदाट जंगलामध्ये काढली व सकाळी पहाटे नरेंद्र डोंगर येथून खाली उतरून ती कुडाळच्या दिशेने रवाना झाली. आकेरी हुमरस (खान मोहल्ला) कुडाळ झिरो पॉईंटच्या दिशेने जाताना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सामाजिक बांधिलकी आपत्कालीन टीमला सापडल्याची बातमी ऐकून परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले. यासाठी सामाजिक बांधिलकी टीमने खूप मेहनत घेतली. रात्री दोन वाजेपर्यंत शोधकार्य सुरू होते. पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केले होती. या शोध मोहिमेत सामाजिक बांधिलकीचे अध्यक्षा रवी जाधव, रुपा मुद्राळे, संजय पेडणेकर, दीपक सावंत, शुभम सावंत, समीरा खलील, आमीन खलील, अरुण घाडी, संकेत माळी आदींनी सहभाग घेतला.