Thur, March 30, 2023

बावळटमध्ये वृद्धाचा
नदीत बुडून मृत्यू
बावळटमध्ये वृद्धाचा नदीत बुडून मृत्यू
Published on : 2 December 2022, 2:19 am
बावळटमध्ये वृद्धाचा
नदीत बुडून मृत्यू
सावंतवाडी, ता. २ ः बावळट येथील वृध्दाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अर्जुन महादेव सावंत (वय ८१) असे त्याचे नाव आहे. याबाबतची खबर दिलीप विठ्ठल सावंत यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की ः अर्जुन सावंत हे आज सकाळी सहाच्या सुमारास सावंत कोणालाही काही न सांगता निघून गेले. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. यावेळी माऊली कोंड येथे तेरेखोल नदीपात्रात त्यांचा मृतदेह तरंगत असल्याचा आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.