वैभववाडीत सरपंचपदांसाठी ४७ अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत सरपंचपदांसाठी ४७ अर्ज
वैभववाडीत सरपंचपदांसाठी ४७ अर्ज

वैभववाडीत सरपंचपदांसाठी ४७ अर्ज

sakal_logo
By

66182
वैभववाडी ः ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी झुंबड उडाली.

वैभववाडीत सरपंचपदांसाठी ४७ अर्ज

सदस्य पदासाठी १२५ जण इच्छुक; तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णतः बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २ ः तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ४७ तर १२५ सदस्यांसाठी २२३ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून चार ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णतः बिनविरोध झाली आहे. उंबर्डेत सरपंचपदासाठी पाच आणि ९ सदस्यांसाठी ३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे १७ सरपंच आणि १२५ सदस्यांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू झाली होती. परंतु, सुरूवातीला अतिशय संथगतीने नामनिर्देशनपत्र दाखल झाली. मात्र, कालपासून नामनिर्देशनपत्र भरण्याची राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली. आज अखेरच्या दिवशी १७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकुण ४७ उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले. १२५ सदस्यांसाठी २२३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणुक बिनविरोध झाली आहे. यामध्ये गडमठ, अरूळे, निमअरूळे, उपळे, जांभवडे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. यातील अरूळे ग्रामपंचायतीमध्ये एक जागेसाठी निवडणुक होणार दोन जागांसाठी निवडणुक होणार आहे. उर्वरित चारही ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध झाली आहे.
कुर्ली सरपंचपदासाठी दोन तर ७ जागांसाठी १७, उंबर्डे सरपंचपदासाठी ५ तर ९ जागांसाठी ३३, नावळे सरपंचपदासाठी ३ तर ७ जागांसाठी १४, करूळ सरपंचपदासाठी ४ तर ९ जागांसाठी १३, हेत सरपंचपदासाठी २ तर ७ जागांसाठी ९, नानीवडे सरपंचपदासाठी २ तर ७ जागांसाठी १०, नेर्ले सरपंचपदासाठी २ तर ७ जागासांठी ११, अरूळे सात जागांसाठी ९, कोळपे सरपंचपदासाठी ६ तर ९ जागांसाठी २३, तिथवली सरपंचपदासाठी ३ तर ७ जागांसाठी १४, नापणे सरपंचपदासाठी ५ तर ७ जागांसाठी २०, सडुरे शिराळे सरपंचपदासाठी ६ तर ७ जागांसाठी ९, तिरवडे तर्फे खारेपाटण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी २ तर ७ जागांसाठी १६ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.
------------
चौकट
तिथवलीत भाजपमध्ये धुसफुस
भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्या तिथवली ग्रामपंचायतीमध्ये पक्षातर्गंत धुसफुस चव्हाट्यावर आली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी भाजपाच्या दोन गटानी सरपंचपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
-----------
चौकट
सरपंचपदातच रस
तालुक्यातील १७ ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यपदांसाठी नामनिर्देशन पत्रांची संख्या पाहता राजकीय पक्षांनी सरपंचपदावर फोकस केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.