
सरपंच पदासाठी दोडामार्गात ९४ अर्ज
सरपंच पदासाठी
दोडामार्गात ९४ अर्ज
दोडामार्ग, ता. २ : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात सरपंच पदासाठी ९४ तर सदस्य पदासाठी ३८६ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय गवस यांनी दिली. दरम्यान,शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता.२)सरपंच पदासाठी ४७ व सदस्य पदासाठी २२१ असे तब्बल २६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करताना तालुक्यातील उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली. त्यामुळे शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली. शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी ४७ व सदस्य पदासाठी २२१ असे तब्बल २६८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.