चालकाचा ताबा सुटून बस मागे येऊन कलंडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालकाचा ताबा सुटून 
बस मागे येऊन कलंडली
चालकाचा ताबा सुटून बस मागे येऊन कलंडली

चालकाचा ताबा सुटून बस मागे येऊन कलंडली

sakal_logo
By

चालकाचा ताबा सुटून
बस मागे येऊन कलंडली

बावळाटच्या घटनेत तिघे जखमी

सावंतवाडी, ता. २ ः गोव्यावरून नेपाळला पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या खासगी आराम बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने बस चढावावर रिव्हर्स येऊन बावळाट-मुलांडवाडी येथील मोरीत अडकली व कलंडली. अपघाताची ही घटना काल (ता.१) रात्री साडे अकराच्या सुमारास बांदा-दाणोली रस्त्यावर घडली. यात तिघे प्रवासी जखमी झाले असून त्यात महिला प्रवाशांचा समावेश आहे. तेथे ड्युटीवर असलेले पोलिस मयूर सावंत यांनी सतर्कता दाखवत जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही.
अधिक माहिती अशी की ः नेपाळ येथून खासगी आराम बसने प्रवाशी गोवा येथे पर्यटनासाठी आले होते. ते गुरुवारी माघारी परतत असताना बांदा-दाणोली मार्गावरील बावळाट-मुलांडवाडी येथे चढावावर चालकाचा बसवरील ताबा सुटला व बस थेट मोरीच्या खाली घसरून शेतात जाऊन अडकली. या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, तिघे प्रवासी जखमी झाले. रात्री उशिरा हा अपघात झाल्यामुळे कोणाला काहीच समजले नाही. यावेळी बांदा-दाणोली चेक पोस्टवर ड्युटीवर असणारे पोलिस मयूर सावंत, पोलिस अजित घाडी यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात साधना सोनी (वय-३२), निशा खडका (वय २२ रा नेपाळ) तसेच अन्य एक जण जखमी झाला आहे. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी खाजगी वाहनाने पाठवून दिले. रात्री दोन वाजेपर्यत मदतकार्य राबवून पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर ही बस फसलेल्या मोरीतून बाहेर काढत रवाना केली.