देवगड बसस्थानकात मद्यपीचा धुमाकुळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगड बसस्थानकात
मद्यपीचा धुमाकुळ
देवगड बसस्थानकात मद्यपीचा धुमाकुळ

देवगड बसस्थानकात मद्यपीचा धुमाकुळ

sakal_logo
By

देवगड बसस्थानकात
मद्यपीचा धुमाकुळ
देवगड, ता. २ ः येथील बसस्थानकात परिसरात एका मद्यपीने दगड हातात घेवून कधी एस्टीवर तर कधी विद्यार्थ्यावर चाल करून जावून धुमाकुळ घातला. अखेर नागरिक, रिक्षाचालक व पोलिसांनी बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आज दुपारी पावणे पाचच्या सुमारास येथील बसबस्थानक एसटी प्रवाशी व विद्यार्थ्यानी गजबजले होते. या दरम्यान एक मद्यपी हातात दगड घेऊन एसटीसमोर येवून दगड मारण्याच्या तयारीत होता. याचवेळी प्रसंगावधान राखून रिक्षाचालक व व्यापारी धावत जावून त्यांला अडविले मात्र त्याच मद्यपीने आपला मोर्चा बसस्थानकात उभ्या असलेल्या विद्यार्थ्याकडे वळविला. हा प्रकार पाहून स्थानिक रिक्षाचालक व नागरिकांनी त्याला अडवले. पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पोलीस हवालदार उदय शिरगावकर, गणेश चव्हाण, वनिता पडवळ, निलेश पाटील, प्रविण त्रिबंके यांनी जावून त्या मद्यपीला बाहेर काढले.