सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा शुभम साळुंखे सैन्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा
शुभम साळुंखे सैन्यात
सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा शुभम साळुंखे सैन्यात

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा शुभम साळुंखे सैन्यात

sakal_logo
By

66223
शुभम साळुंखे

सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा
शुभम साळुंखे सैन्यात

मालवण, ता. ३ ः येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील एनसीसी विभागाचा कॅडेट शुभम साळुंखे याची जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सैन्य दलात निवड झाली.
‘नॅक’ची तयारी सुरू असताना देखील हा विद्यार्थी प्रत्येक कार्यक्रमाला हजर होता. तरीही त्यातून त्याने आपला अभ्यास व सराव सोडला नव्हता. ‘‘मिलिटरीमध्ये भरती होणारच’’, अशी त्याची जिद्द असल्यामुळे त्याने कसून सराव सुरू ठेवला. त्यातूनच त्याला हे यश प्राप्त झाले. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष आदींनी शुभमचे कौतुक केले. कॉलेजच्या एनसीसी विभागाची कामगिरी दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. याचा लाभ कॉलेजमधील विद्यार्थ्यांना होत आहे. अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये एनसीसीमध्ये प्रवेश घेत आहेत, असे प्राचार्य ठाकूर यांनी सांगितले. शुभमला कॉलेज एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग कॉलेजमधून जास्तीत जास्त विद्यार्थी कसे भरती होतील, याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन प्रयत्न करणार आहोत. भविष्यात शुभमची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी सैन्य दलात व पोलिस दलामध्ये भरती व्हावे, असे आवाहन डॉ. खोत यांनी केले आहे.