गोळे हायस्कूल व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोळे हायस्कूल व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेता
गोळे हायस्कूल व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेता

गोळे हायस्कूल व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेता

sakal_logo
By

rat०३९.txt

(पान ६ साठी)

फोटो ओळी
-rat३p६.jpg ः
६६२२०
हर्णै ः तालुकास्तरावर विजय मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना प्रशिक्षक संदीप क्षीरसागर व गोळे हायस्कूलच्या विद्यार्थिनी.

गोळे हायस्कूल व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेता

प्रथमच सहभाग ; जिल्हास्तरावर खेळण्याची संधी
सकाळ वृत्तसेवा ः
हर्णै, ता. ३ ः येथील एन. डी. गोळे हायस्कूलला व्हॉलिबॉल स्पर्धेमध्ये शाळेच्या क्रीडाक्षेत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच यश मिळाल्याने तालुकास्तरावरून तसेच हर्णै गावातून विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे कौतुक होत आहे.
तालुकास्तरावर माध्यमिक शालांत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हर्णै गोळे हायस्कूलमधील १७ वर्षाखालील मुलींनी शालेय क्रीडास्पर्धेमध्ये व्हॉलिबॉल या खेळामध्ये सहभाग घेतला होता. क्रीडाशिक्षक संदीप क्षीरसागर यांच्या उत्तम सहकार्याने संघ तयार करण्यात आला होता. यामध्ये विधिती चौलकर (कर्णधार), इनारा जुनानी, कृतिका चोगले, तन्वी तुरे, सचि सुर्वे, ईशा तुरे, पायल वागजे, सानिका जाधव, कविता कुमावत, गौतमी पाटील, हर्षदा शिंदे, सिद्धी जाधव या खेळाडूंचा समावेश होता.
समोरचा सरस्वती विद्यामंदिर दापोली संघ तुल्यबळ असून देखील या मुलींनी चुरशीची खेळी करून तालुकास्तरावर व्हॉलिबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळवून जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळवली आहे. या आधीही शाळेचे अनेक विद्यार्थी जिल्हा, विभागस्तरावर अॅथलेटिक्स, खो-खो, थाळीफेक आदी खेळांमध्ये चमकले आहेत.