
ड्रायव्हिंग, जलतरणात कुणाल पेडणेकरचे यश
66236
कुणाल पेडणेकर
ड्रायव्हिंग, जलतरणात
कुणाल पेडणेकरचे यश
वेंगुर्ले ः क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गतर्फे आयोजित जिल्हास्तरीय १९ वर्षांखालील जलतरण व ड्रायव्हिंग स्पर्धेत येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या कुणाल पेडणेकर याने यश संपादन केले. क्रीडा संकुल ओरोस येथे घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत २०० मीटर फ्री स्टाईल, १०० मीटर फ्री स्टाईल, ५० मीटर फ्री स्टाईल या प्रकारात कुणाल याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याची शालेय विभागीय स्तरावर होणाऱ्या जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कुणालला बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, जलतरणचे प्रशिक्षक दीपक सावंत, शिक्षण प्रसारक मंडळांचे प्रशिक्षक हेमंत गावडे तसेच शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले.
.............
हनुमंत गडावर २५ ला
तोफगाडा लोकार्पण
बांदा ः फुकेरी (ता. दोडामार्ग) येथील शिवछत्रपतीकालीन ऐतिहासिक हनुमंत गडावर २५ डिसेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पद्मश्री परशुराम गंगावणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. २४ ला सांस्कृतिक कार्यक्रम, जागर, गोंधळ होणार आहे. २५ ला सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन होणार आहे. त्यानंतर तोफगाडा लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, सर्व दुर्गसेवक, दुर्गसेविका, श्री देवी माऊली सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ फुकेरी व फुकेरी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे. शिवप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.