
कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन
कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये
कायदेविषयक मार्गदर्शन
कुडाळ, ता. ३ ः महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्ड अनुदानित संचलिन कौटुंबिक सल्ला व यांच्यावतीने पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले.
यावेळी महिला मंडळ कुडाळच्या अध्यक्षा उषा आठल्ये, उपाध्यक्षा सुषमा कुलकर्णी, प्रमुख वक्त्या म्हणून जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या सदस्या अॅड. नम्रता नेवगी, केंद्राचे सल्लागार करिश्मा परब, हरेश शेर्लेकर, प्रियांका बाक्रे, महाविद्यालयाचे शिक्षक सुळ सर, नूतन परब आदी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक अॅड. नेवगी यांनी अॅन्टी रॅगिंग कायदा १९८८ या विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थेच्या उपाध्यक्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिल्याने त्यांच्या कायदेविषयक ज्ञानात भर पडली. अशा कार्यक्रमातून भावी पिढीला कायद्याचे ज्ञान करून देणे गरजेचे आहे, असे मत महाविद्यालयाने मांडले. या कार्यक्रमात ८० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.