दाभोळ-पांगारी गावासाठी धरण बांधून देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-पांगारी गावासाठी धरण बांधून देणार
दाभोळ-पांगारी गावासाठी धरण बांधून देणार

दाभोळ-पांगारी गावासाठी धरण बांधून देणार

sakal_logo
By

पांगारी गावासाठी धरण
बांधून देणारः कदम
दाभोळ, ता. ३ः पिण्याच्या तसेच इतर शेतीपुरक व्यवसाय निर्माण करण्याकरिता पांगारी गावासाठी भडवळे येथे बांधण्यात येत असलेल्या धरणाप्रमाणेच पांगारी गावासाठीही धरण बांधून पांगारी गावाची पाण्याची समस्या कायमची निकाली काढणार असल्याचे आश्वासन आमदार योगेश कदम यांनी दिले.
जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामाचे भूमिपूजन पांगारी नाचरेवाडी येथे आमदार योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. ते म्हणाले, जलजीवन मिशन या योजनेचा आराखडा तयार करताना मी जातिनिशी लक्ष घातले होते. प्रत्येक गावातील सर्व वाड्यांचा या योजनेत समाविष्ट आहे की नाही याची खात्री करून घेत होतो. कारण, पाणीप्रश्‍न हा महत्वाचा आहे. पुढील ३० वर्ष तरी पुन्हा अशी योजना अंमलात येणार नसल्याने आपण सर्व ग्रामस्थांनी ही योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. माजी उपसभापती व महिला उपसंघटक ममता शिंदे, दाभिळ सरपंच फातिमा मोहिमतुले, विभागप्रमुख मोहन भागणे, माजी सरपंच धोंडू नाचरे उपस्थित होते.