
मंडणगड-14 सरपंचांसाठी 44 अर्ज दाखल
rat०३१९.txt
(पान २ साठी)
१४ सरपंचांसाठी ४४ अर्ज दाखल
मंडणगड तालुका ; ४२ प्रभागातील १०६ सदस्यांसाठी १९३ अर्ज
मंडणगड, ता. ३ ः राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींचा सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. (ता. २) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर १४ ग्रामपंचायतींच्या १४ सरपंचांसाठी ४४, तर ४२ प्रभागातील १०६ सदस्यांसाठी १९३ अर्ज दाखल झाले.
अडखळ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ४, तर ग्रामपंचायत सदस्यपदाकरिता १५ अर्ज दाखल झाले आहेत. शिगवण ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी ३, तर सदस्यांसाठी १४ अर्ज दाखल झाले. देव्हारेत सरपंचपदासाठी २, सदस्यांसाठी २०, लोकरवणमध्ये सरपंचपदासाठी ३, सदस्यासाठी ९, वेसवीत सरपंच- ३, सदस्य- १८, तिडे-तळेघर- सरपंच- ३, सदस्य- १७, पिंपळोली- सरपंच- ३, सदस्य- १४, सडे- सरपंच- १, सदस्यासाठी- ७, बाणकोट- सरपंच- ३, सदस्य- ८, विन्हे- सरपंच- ४, सदस्य- १०, मुरादपूर- सरपंच- ३, सदस्य- ११, कुंबळे- सरपंच- ३, सदस्य- १५, दुधेरे बामणघर- सरपंच-४, सदस्य- १४, दहागाव- सरपचं- ५, सदस्यपदासाठी ११ अर्ज दाखल झाले आहेत.