राज्यातील सत्तांतरावेळी दाखवली कला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील सत्तांतरावेळी दाखवली कला
राज्यातील सत्तांतरावेळी दाखवली कला

राज्यातील सत्तांतरावेळी दाखवली कला

sakal_logo
By

rat०३२१.txt

(पान ५ साठी)

फोटो ओळी
- ratchl३२.jpg ः
66306
चिपळूण ः लोटिस्मातर्फे पालकमंत्री उदय सामंत यांचा गौरव करताना प्रकाश देशपांडे.

आम्हीही कलाकार, सत्तांतरावेळी दाखवली कला

उद्योगमंत्री उदय सामंत ; लोककला महोत्सव भव्य करण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ३ ः चिपळूणमध्ये लोककला महोत्सव होत आहे. या महोत्सवाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसे आम्हीही कलाकार आहोत. सहा महिन्यांपूर्वी आम्हीही राज्यात सत्तांतरात आमची कला दाखवली आहे. चांगलं काम करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहायला हवे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
लोककला महोत्सवाच्या निमित्ताने विकासाच्या व सांस्कृतिक चळवलीला आमदार शेखर निकम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचाही पाठिंबा आहे, हे कौतुकास्पद असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
येथील लोकमान्य टिळक वाचनालय, अप्पा जाधव अपरांत संशोधन केंद्र व मराठी साहित्य परिषदेच्या वतीने होणाऱ्या लोककला महोत्सवाच्या कार्यालयाचे उदघाटन झाले. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. या वेळी लोटिस्माच्या वस्तू संग्रहालयाच्या नव्याने उभारणीच्या कामाचा आरंभही मंत्री सामंत यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी केले. साहित्य संमेलनावेळी २५ लाख रुपये शासनाकडून देण्याची घोषणा झाली होती. हा निधी अडकला होता; परंतु पालकमंत्री झाल्यांनतर तातडीने सामंत यांनी हा निधी आणून दिला. लोटिस्माचे वस्तू संग्रहालय पुरात वाहून गेले. त्या वेळी सामंत यांनी ५० लाखांचा निधी जाहीर केला. हा निधी बांधकाम विभागाकडे वर्गही झाला आहे. सामंत यांच्या नेतृत्वाखाली लोककला महोत्सव भव्यदिव्य असा करू, असा विश्वासही देशपांडे यांनी व्यक्त केला.
सामंत यांनी लोककला महोत्सवाला जिल्हा नियोजनमधून निधी देण्याची घोषणा केली. चिपळूण ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. इथल्या साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीला सर्वच पक्षाची मंडळी सहकार्य करतात. इतकेच नव्हे तर पुढाकार घेतात, याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. सामंत यांचा लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, प्रकाश देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष आशिष खातू, लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, विनायक ओक, सुनील कुलकर्णी, मनिषा दामले, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, कैसर देसाई, कवी अरुण इंगवले, लोककला महोत्सवाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, ग्रंथपाल गौरी भोसले आदी उपस्थित होते.